Rohit Sharma & Babar Azam Dainik Gomantak
क्रीडा

ODI World Cup पूर्वी आली मोठी बातमी, पाकिस्तानी संघ भारतात येणार नाही!

India vs Pakistan, World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषक या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात आयोजित केला जाणार आहे.

Manish Jadhav

India vs Pakistan, World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषक या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात आयोजित केला जाणार आहे. याआधी बुधवारी पाकिस्तान क्रिकेट संघाशी संबंधित एक मोठी अपडेट समोर आली. आयसीसीच्या या स्पर्धेत खेळण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट संघ भारतात येणार नाही का, हा प्रश्न कायम आहे. दरम्यान, एका अहवालात मोठा दावा करण्यात आला आहे.

पाकिस्तानचा संघ भारतात येणार नाही?

भारत (India) आणि पाकिस्तानचे राजनैतिक संबंध सध्या चांगले नाहीत. दुसरीकडे, दोन्ही संघांनी गेल्या अनेक वर्षांपासून एकही द्विपक्षीय मालिका खेळलेली नाही.

ना भारतीय संघ पाकिस्तानात जातो, ना शेजारील देशाचा संघ भारतात येतो. भारत आगामी एकदिवसीय विश्वचषकाचे यजमानपद भूषवत आहे.

दरम्यान, पाकिस्तानशी संबंधित बातम्या समोर आल्या होत्या की, पाकिस्तानचा संघ भारतात येणार नाही आणि त्याचे सामने बांगलादेशमध्ये आयोजित केले जाऊ शकतात.

आयसीसी स्तरावर चर्चा झाली

क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तान क्रिकेट संघ बांगलादेशमध्ये 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकाचे सामने खेळू शकेल अशी चर्चा सुरु आहे.

भारत या स्पर्धेचे यजमानपद भूषवत आहे, मात्र दोन्ही देशांमधील राजकीय संबंध लक्षात घेता आयसीसी स्तरावर याविषयी विचारविनिमय करण्यात आला आहे.

आशिया चषकावरही एक समस्या आहे

वास्तविक, आशिया चषक-2023 चे यजमानपद पाकिस्तानला मिळाले असले तरी भारतीय संघ शेजारी देशाचा दौरा करणार नाही यावर ठाम आहे.

आशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) प्रमुख जय शाह आहेत, ते BCCI सचिव म्हणूनही काम करतात. भारतीय संघ पाकिस्तानात जाणार नाही, असे जय शाह यांनी आधीच सांगितले होते.

अशा परिस्थितीत भारत आशिया चषक स्पर्धेतील आपले सामने तटस्थ ठिकाणी खेळेल असा दावा काही अहवालांमध्ये करण्यात आला आहे.

अंतिम निर्णय येणे बाकी आहे

आशिया चषक स्पर्धेच्या यजमानपदावरुन निर्माण झालेला संघर्ष संपवण्यासाठी भारताचे सामने पाकिस्तानच्या बाहेर हलवण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आल्याचे या अहवालात म्हटले आहे. यावर एसीसीच्या सर्व सदस्यांनीही तत्त्वत: सहमती दर्शवली. गेल्या आठवड्यात, आयसीसी बोर्डाच्या बैठकीच्या बाजूला, दुबईमध्ये एसीसी सदस्य देशांची बैठक झाली, जिथे यावर एकमत झाले. मात्र, अंतिम निर्णय येणे बाकी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India vs Australia: मुसळधार पाऊस, विजेचा कडकडाट... वीज पडून एका खेळाडूचा मृत्यू, 'या' कारणामुळं भारत विरूध्द ऑस्ट्रेलिया सामना रद्द

Fish Price Hike: मासे खाणं महागलं... सुरमई, पापलेट, कोळंबीची किंमत पाहून पळेल तोंडचं पाणी

Snake Attack Video: साप पकडतानाचा थरार कॅमेऱ्यात कैद! सापाने अचानक केला हल्ला, नंतर काय घडलं? अंगावर काटा आणणारा व्हिडिओ पाहा

"गोव्यात हे चाललंय काय?", 450 रुपयांच्या टॅक्सी स्कॅममधून सुटलो, पोलिसांनी 500 रुपये घेतले; जर्मन इन्फ्लुएंसरचा Video Viral

7th Pay Commission Goa: सातवा वेतन आयोग लागू करा! गोव्यातील पंचायत कर्मचाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

SCROLL FOR NEXT