Shoaib Akhtar Dainik Gomantak
क्रीडा

PAK vs NZ: न्यूझीलंड बोर्डाने पाकिस्तानी क्रिकेटची हत्या केली

यातच आता पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) न्यूझीलंड संघाला फटकारताना म्हटले की, त्याने पाकिस्तान क्रिकेटची हत्या केली आहे.

दैनिक गोमन्तक

न्यूझीलंडने शुक्रवारी सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तान दौरा रद्द केल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) आणि माजी क्रिकेटपटूंनी संताप व्यक्त केला. यातच आता पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) न्यूझीलंड संघाला फटकारताना म्हटले की, त्याने पाकिस्तान क्रिकेटची हत्या केली आहे. तर अलीकडेच पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाचे नवनियुक्त अध्यक्ष रमीज राजा (Rameez Raja) यांनी न्यूझीलंड बोर्डाने (New Zealand Board) आयसीसी (ICC) कोर्टामध्ये आमचे म्हणणे ऐकावे लागले असा इशारा दिला आहे.

शोएब अख्तर आपल्या ट्विटच्या माध्यमातून म्हणाला, न्यूझीलंडने पाकिस्तान क्रिकेटची हत्या केली. न्यूझीलंडला काही गोष्टी लक्षात ठेवण्याची गरज आहे. क्राइस्टचर्च हल्ल्यात 9 पाकिस्तानी ठार झाले. पाकिस्तानने कोविड -19 च्या परिस्थितीत न्यूझीलंडचा दौरा केला होता.

शिवाय, अख्तर पुढे म्हणाला की, आमचे पंतप्रधान इम्रान खान (Prime Minister Imran Khan) यांनी त्यांच्या न्यूझीलंडच्या समकक्षांशी बोलून आश्वासन दिले, परंतु असे असूनही न्यूझीलंड संघाने खेळण्यास नकार दिला. क्रिकेट न्यूझीलंडच्या घोषणेपूर्वी इम्रान खान यांनी न्यूझीलंडच्या पंतप्रधान जॅसिंडा आर्डर्न (Prime Minister Jacinda Ardern) यांच्याशी फोनवरुन चर्चा केली आहे. दरम्यान इम्रान म्हणाले, पाकिस्तानकडे सर्वोत्तम अशी गुप्तचर यंत्रणा आहे, परंतु क्रिकेट NZ ने सर्व आश्वासने देऊनही मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला.

त्याचवेळी, पीसीबीचे नवे अध्यक्ष रमीज राजा यांनी न्यूझीलंड बोर्डाला फटकारताना सांगितले की, कीवी बोर्डाने एकतर्फी निर्णय घेतला. हा अत्यंत निराशाजनक निर्णय आहे. क्रिकेट चाहते आणि खेळाडूंसाठी मला खूप वाईट वाटत आहे. सुरक्षेच्या धोक्याबाबत न्यूझीलंड बोर्डाचा एकतर्फी निर्णय अत्यंत निराशाजनक आहे. न्यूझीलंड कोणत्या जगात राहतो? आता आयसीसीमध्ये न्यूझीलंड आमचे म्हणणे ऐकेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT