Pakistan Cricket Team  Dainik Gomantak
क्रीडा

PAK vs NZ: पाकिस्तानने टी-20 अन् वनडे मालिकेसाठी संघ केला जाहीर, या खेळाडूंचे पुनरागमन

PAK vs NZ: पाकिस्तानने न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे.

Manish Jadhav

PAK vs NZ: पाकिस्तानने न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे. कर्णधार बाबर आझम, मोहम्मद रिझवान, फखर जमान आणि शाहीन शाह आफ्रिदी परतले आहेत.

तब्बल चार महिन्यांनंतर आफ्रिदी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतणार आहे. त्याचवेळी बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेत विश्रांती घेतल्यानंतर परतत आहेत. 14 एप्रिल ते 7 मे दरम्यान लाहोर, रावळपिंडी आणि कराची येथे टी-20 मालिका खेळवली जाईल.

वर्ल्ड कप फायनल दरम्यान दुखापत झाली

गेल्या वर्षी जुलैमध्ये गाले येथे श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीदरम्यान शाहीनच्या गुडघ्याला दुखापत झाली होती.

T20 विश्वचषकानंतर त्याचे पुनर्वसन पूर्ण करण्यासाठी त्याने इंग्लंड आणि न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) पाच कसोटी आणि तीन एकदिवसीय सामनेही गमावले होते.

तो शेवटचा T20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानकडून खेळला होता, जिथे तो फक्त 2.1 षटके टाकू शकला होता. मात्र, 16 व्या षटकात गुडघ्याला दुखापत झाल्याने त्याने मैदान सोडले होते.

शादाब उपकर्णधार राहील, तीन युवा खेळाडूंचा समावेश आहे

शादाब खान (Shadab Khan) उपकर्णधार म्हणून पुनरागमन करेल. त्याचबरोबर अफगाणिस्तानविरुद्ध पदार्पण करणाऱ्या इहसानुल्ला, सैम अयुब आणि जमान खान या तीन युवा खेळाडूंना टी-20 संघात कायम ठेवण्यात आले आहे.

इहसानुल्लाचा कारकिर्दीत प्रथमच एकदिवसीय संघात समावेश करण्यात आला आहे. हे पथक 6 एप्रिलला लाहोरमध्ये जमणार असून 7 एप्रिलपासून प्रशिक्षण शिबिर सुरु होईल.

पाकिस्तानचा टी-20 संघ:

बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), फहीम अश्रफ, फखर जमान, हारिस रौफ, इफ्तिखार अहमद, इहसानुल्ला, इमाद वसीम, मोहम्मद हरिस, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, नसीम शाह, सैम अयुब, शाहीन शाह आफ्रिदी, शान मसूद आणि जमान खान.

पाकिस्तानचा वनडे संघ:

बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), अब्दुल्ला शफीक, फखर जमान, हारिस रौफ, हारिस सोहेल, इहसानुल्लाह, इमाम-उल-हक, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, सलमान अली आगा, शाहीन शाह आफ्रिदी, शान मसूद आणि उसामा मीर. राखीव खेळाडू: अब्बास आफ्रिदी, अबरार अहमद आणि तय्यब ताहिर.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG 4th Test: भारताच्या जिद्दीपुढे इंग्लंडचे ‘सरेंडर’! गिल, जडेजा अन् सुंदरच्या शतकांच्या जोरावर चौथा कसोटी सामना ड्रॉ

'Ayushman Card'च्या नियमात मोठा बदल, 'या' आजारांवर खाजगी रुग्णालयात मिळणार नाही मोफत उपचार

Viral Video: '...अन् हात-पाय हलवत राहिला', नाचता-नाचता रोबोटचा ‘तो’ थरारक क्षण, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल!

IND vs ENG 4th Test: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये घडला इतिहास! इंग्लंडने पटकावले पहिले स्थान; केला 'हा' नवा पराक्रम

‘बाबा, माझ्या भावाला ओरडू नका!’: 5 वर्षांची चिमुकली 3 वर्षांच्या भावासाठी बाबांसमोर ढाल बनून उभी राहिली; हृदयस्पर्शी Video Viral

SCROLL FOR NEXT