Shakib Al Hasan Dainik Gomantak
क्रीडा

PAK vs BAN: शाकिबचा मोठा कारनामा, दिग्गजांना टाकले मागे; आता विराट-रोहितचा नंबर!

Shakib Al Hasan, PAK vs BAN: बांगलादेशच्या वनडे संघाचा कर्णधार आणि स्टार अष्टपैलू खेळाडू शकीब अल हसन हा संघाचा सर्वात अनुभवी खेळाडू आहे.

Manish Jadhav

Shakib Al Hasan, PAK vs BAN: बांगलादेशच्या वनडे संघाचा कर्णधार आणि स्टार अष्टपैलू खेळाडू शकीब अल हसन हा संघाचा सर्वात अनुभवी खेळाडू आहे. या विश्वचषकात त्याच्या संघाची कामगिरी काही विशेष झाली नसली तरी मंगळवारी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याने विशेष कामगिरी केली.

त्याने एबी डिव्हिलियर्स आणि ब्रायन लारा यांना मागे टाकले. एवढेच नाही तर तो आता विराट कोहली आणि रोहित शर्माच्या जवळ पोहोचला आहे. हा आकडा एकदिवसीय विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्याचा आहे.

शाकिब विराट आणि रोहितच्या जवळ पोहोचला

एकदिवसीय विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा शाकिब आता 7वा फलंदाज ठरला आहे. त्याने या यादीत दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज एबी डिव्हिलियर्स आणि दिग्गज ब्रायन लारा यांना मागे टाकले आहे. या यादीत सचिन तेंडुलकर पहिल्या क्रमांकावर आहे.

तर भारतीय फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) पाचव्या आणि रोहित शर्मा सहाव्या स्थानावर आहे. विराट आणि रोहित यांच्यात जोरदार स्पर्धा आहे. आता शाकिबही या दोघांच्या जवळ आला आहे.

एकदिवसीय विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू

सचिन तेंडुलकर- 2278 धावा (45 सामने, 44 डाव)

रिकी पाँटिंग- 1743 धावा (46 सामने, 42 डाव)

कुमार संगकारा- 1532 धावा (37 सामने, 35 डाव)

डेव्हिड वॉर्नर- 1405 धावा (24 सामने, 24 डाव)

विराट कोहली- 1384 (32 सामने, 32 डाव)

रोहित शर्मा- 1376 (23 सामने, 23 डाव)

शकीब अल हसन- 1250 धावा (35 सामने, 35 डाव)

विश्वचषक 2023 मधील शाकिबची कामगिरी

दुसरीकडे, या स्पर्धेत शाकिबची कामगिरी काही विशेष झाली नाही. मधेच तो जखमी झाला आणि नंतर मायदेशी परतला. त्याने पाकिस्तानविरुद्ध (Pakistan) 43 धावांची खेळी खेळली. आतापर्यंत, तो विश्वचषक 2023 चा सहावा सामना खेळत आहे ज्यात त्याने आपल्या बॅटने 6 डावात 104 धावा केल्या आहेत. या सामन्यापूर्वी त्याने 5 सामन्यात 7 विकेट घेतल्या होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'त्या' ग्रामसेवकावर कारवाई अटळ, पंचायत सचिव बनणे भोवले; उद्या निलंबन आदेश शक्य

Shivaji Maharaj: 'स्वराज्यासाठी दिले प्राण'! छत्रपती शिवाजी महाराजांचा बालमित्र; अफजलखानाच्या सैन्याची उडवली होती दाणादाण

Rashi Bhavishya 03 August 2025: आरोग्य चांगलं राहील; मन प्रसन्न राहील;आर्थिक लाभाचे योग

Mahadevi Elephant: जनतेनं संघर्ष टाळावा, आमच्यासोबत उभं राहावं; वनतारानं स्पष्ट केली भूमिका; नेमकं काय केलंय आवाहन?

Friendship Day 2025: फ्रेंडशिप डे स्पेशल! तुमच्या जिगरी मित्राला पाठवा 'हे' खास संदेश

SCROLL FOR NEXT