IND vs BAN: वाईड बॉल ड्रामा अन् विराटचे शतक, भारताच्या विजयाच्या क्षणी नक्की घडलं काय?

Wide Ball Controversy: भारत विरुद्ध बांगलादेश संघातील सामन्यादरम्यान विराट 97 धावांवर असताना पंचांनी वाईड बॉल न दिल्याने चर्चांना उधाण आले होते. त्याबद्दलचा नियम जाणून घ्या.
Virat Kohli | India vs Bangladesh | No-Wide ball Controversy
Virat Kohli | India vs Bangladesh | No-Wide ball Controversy
Published on
Updated on

ICC ODI Cricket World Cup 2023, India vs Bangladesh, No-Wide ball Controversy, Virat Kohli Century:

भारतीय क्रिकेट संघाने गुरुवारी (19 ऑक्टोबर) वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत बांगलादेशविरुद्ध 7 विकेट्सने विजय मिळवला. हा भारताचा यंदाच्या स्पर्धेतील सलग चौथा विजय होता. भारताच्या विजयात स्टार फलंदाज विराट कोहलीने महत्त्वाचा वाटा उचलला. मात्र, या सामन्याच्या अखेरीस एक वादही समोर आला.

झाले असे की बांगलादेशने भारतासमोर 257 धावांचे आव्हान ठेवले होते. याआव्हानाचा पाठलाग करताना भारताने 41 षटकात 3 बाद 255 धावा केल्या होत्या. त्यामुळे 54 चेंडूत भारताला विजयासाठी 2 धावांचीच गरज होती. त्यावेळी विराट 97 धावांवर खेळत होता आणि त्याच्यासह केएल राहुल 34 धावांवर खेळत होता.

यानंतर 42 व्या षटकाचा पहिला चेंडू नसूम अहमदने लेग साईडला टाकला. त्यावर मैदानावरील पंच रिचर्ड केटलबोरो यांनी वाईड करार दिला नाही. त्यामुळे बरीच चर्चा झाली. तसेच सोशल मीडियावरही प्रतिक्रिया उमटल्या.

Virat Kohli | India vs Bangladesh | No-Wide ball Controversy
World Cup 2023: मैदान जिंकणारा विराट मन जिंकतो; कारण एकच!

दरम्यान, क्रिकेट नियमांनुसार वाईड चेंडू देण्याचा निर्णय पंचांचा असतो. नियमानुसार जेव्हा गोलंदाज रन-अप घेत असतो आणि चेंडू हातातून सोडण्यावेळी जिथे फलंदाज उभा असतो, त्यावरून वाईड चेंडूचा निर्णय घेतला जातो.

वाईड चेंडू तेव्हा दिला जातो, जेव्हा फलंदाज चेंडूपर्यंत पोहचू शकत नाही म्हणजेच शॉट खेळू शकत नाही. अशा परिस्थितीत चेंडू फलंदाजाच्या जवळून जात असेल आणि फलंदाज तो सोडून देत असेल, तर त्या चेंडूला वाईड ठरवायचे की नाही, याचा निर्णय पंचांचा असतो.

तथापि, विराटबाबत सांगायचे झाल्यास जेव्हा नसूम चेंडू टाकण्यासाठी येत होता, तेव्हा विराट लेग स्टंपच्या बाहेर उभा होता, त्यानंतर नसूमने चेंडू टाकल्यानंतर विराट ऑफ स्टंपच्या दिशेने पुढे आला होता. त्यामुळे चेंडू त्याच्या मागून गेला.

मात्र, नियमानुसार चेंडू पडण्यावेळी विराट लेग साईडला उभा होता. त्यामुळे जर विराट तिथेच थांबला असता, तर चेंडू त्याच्या पॅडवर लागू शकला असता. अशा परिस्थितीत त्या चेंडूला वाईड करार देण्याचा किंवा न देण्याचा पंचांचा निर्णय होता.

Virat Kohli | India vs Bangladesh | No-Wide ball Controversy
Virat Kohli: क्रिकेट, कोटला आणि कोहली! दिल्लीमध्ये खेळण्याबद्दल 'लोकल बॉय' विराट भावूक, म्हणाला...

दरम्यान, लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की जरी पंचांनी तो चेंडू वाईड दिला असता, तरी भारताला विजयासाठी आणखी 1 धावेची गरज पडली असती. त्यामुळे विराटला त्यानंतरही शतक करण्याची संधी मिळाली असती.

विशेष म्हणजे 42 व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर एक धाव काढण्याची संधी होती, पण केएल राहुलने विराटच्या शतकासाठी एकेरी धाव काढण्यास नकार दिला. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर विराटने षटकार ठोकला आणि भारताच्या विजयाबरोबरच आपल्या शतकावरही शिक्कामोर्तब केले.

विराटने या सामन्यात 97 चेंडूत 103 धावांची नाबाद खेळी केली. त्याने या खेळीत 6 चौकार आणि 4 षटकार मारले. तसेच केएल राहुल 34 धावांवर नाबाद राहिला. याशिवाय भारताकडून शुभमन गिल आणि रोहित शर्मा यांनीही सलामीला 88 धावांची भागीदारी चांगली सुरुवात दिली होती. गिलने ५३ धावांची खेळी केली, तर रोहितने 48 धावा केल्या.

तत्पूर्वी, बांगलादेशने तान्झिद हसन (51) आणि लिटन दास (66) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 8 बाद 256 धावा केल्या होत्या. भारताकडून गोलंदाजी करताना रविंद्र जडेजा, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच शार्दुल ठाकूर आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com