FIFA World Cup 2022 Dainik Gomantak
क्रीडा

FIFA World Cup 2022: केवळ एकदा भारतीय संघ फिफा वर्ल्डकपसाठी ठरला पात्र; पण 'या' कारणामुळे हुकली संधी...

फिफाच्या क्रमवारीत भारत सध्या कितव्या क्रमांकावर आहे, घ्या जाणून

गोमन्तक डिजिटल टीम

FIFA World Cup 2022: फिफा वर्ल्डकप स्पर्धेस 20 नोव्हेंबरपासुन सुरुवात होत आहे. या स्पर्धेत एकुण 32 संघ सहभागी असणार आहेत. तथापि, भारत यामध्ये नाहीय. किंवा फिफाच्या अनेक वर्षांच्या या स्पर्धेत भारतीय संघ दिसत नाही. असे नाही की, भारत कधीच या स्पर्धेसाठी पात्र ठरला नाही. एकदा, भारताला ही संधी मिळाली होती.

फिफा वर्ल्डकप हा जगातला सर्वात मोठी स्पोर्ट्स एव्हेंट असतो. यंदा ही स्पर्धा कतार येथे होत आहे. जवळपास महिनाभर चालणाऱ्या या स्पर्धेचा अंतिम सामना 18 डिसेंबर रोजी होणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघ खेळत नाहीय कारण भारतीय फुटबॉल संघ या स्पर्धेसाठी पात्र ठरू शकलेला नाही. सुनील छेत्री याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला फिफा वर्ल्डकपसाठीया पात्रता लेव्हलच्या दुसऱ्या फेरीतच बाहेर पडावे लागले होते.

तसेही आशियातील केवळ 6 च संघ या स्पर्धेत सहभागी आहेत. यात यजमान कतार, सौदी अरेबिया, इराण, जपान, दक्षिण कोरिया, जपान यांचा समावेश आहे. याशिवाय ऑस्ट्रेलियाचा संघ देखील स्पर्धेत आहे. आता यापुर्वी कधीच भारत या स्पर्धेसाठी पात्र ठरलेला नाहीय का? तर असेही नाही. एकदा भारतीय संघ या स्पर्धेसाठी पात्र ठऱला होता. 1950 मध्ये ब्राझिलमध्ये झालेल्या फिफा विश्चचषक स्पर्धेत भारतीय संघ सहभागी झाला होता. पण दुर्देवाने भारतीय संघ या स्पर्धेत सहभागी होऊ शकला नाही.

भारतीय संघ त्या स्पर्धेत भाग घेऊ शकला नाही कारण, भारतीय संघाला तेव्हा फुटबॉल उघड्या पायांनी खेळण्याची सवय होती. बूट घालून फुटबॉल खेळायची सवय भारतीय संघाला नव्हती. आणि हीच सवय भारतासाठी अडचणीची ठरली. फिफाच्या नियमानुसार भारतीय खेळाडुंना बूट घालूनच हा सामना खेळावा लागणार होता. पण भारतीय खेळाडुंना त्याची सवय नसल्याने त्यांनी या स्पर्धेत खेळण्यास नकार दिला होता.

विशेष म्हणजे तेव्हाच्या काळात मोहम्मद अब्दुल सलीम नावाचा एक भारतीय फुटबॉलपटू तर सेल्टिक नावाच्या स्कॉटिश फुटबॉल क्लबसाठीदेखील उघड्या पायांनीच फुटबॉल खेळायचा.

आणखी एक कारण सांगितले जाते ते म्हणजे, ही स्पर्धा परदेशात होणार होती. तेव्हा भारतीय संघाचा खर्च उचलण्यास सरकारने नकार दिला होता. फिफा हा खर्च उचलण्यासाठी तयार होती, मात्र तरीही भारतीय संघ स्पर्धेत उतरू शकला नाही. संघनिवडीवरून वाद, सराव नसल्याने अखेर भारत या स्पर्धेत खेळू शकला नाही. त्यानंतर भारत कधीच फिफा वर्ल्डकप स्पर्धेसाठी पात्र ठरू शकलेला नाही.

भारताचे सध्याचे रँकिंग

सध्या फिफाच्या रँकिंगमध्ये भारतीय फुटबॉल संघ 106 व्या क्रमांकावर आहे. म्हणजेच भारत टॉप-100 मध्ये देखील नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

SCROLL FOR NEXT