T20 कर्णधार बनण्याच्या शर्यतीत हे 3 खेळाडू, जाणून घ्या संपत्तीत कोण आहे आघाडीवर?

T20 World Cup: टीम इंडियाला T20 विश्वचषक 2022 चे जेतेपद पटकावण्यात अपयश आले.
Team india
Team indiaDainik Gomantak
Published on
Updated on

T20 World Cup: T20 विश्वचषक 2022 चे जेतेपद पटकावण्यातटीम इंडियाला अपयश आले. रोहित शर्माच्या कर्णधारपदाची ही सर्वात मोठी परीक्षा होती. मात्र यामध्ये तो पूर्णपणे अपयशी ठरला. T20 विश्वचषक 2022 च्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताचा इंग्लंडकडून 10 गडी राखून पराभव झाला. या पराभवानंतर भारताचे विजेतेपदाचे स्वप्न अपूर्णच राहिले. आगामी काळात रोहित शर्मा T20 चे कर्णधारपद सोडू शकतो. अशा स्थितीत नवा कर्णधार म्हणून तीन खेळाडूंची नावे चर्चेत आली आहेत. चला तर मग त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या संपत्तीबद्दल जाणून घेऊया...

हार्दिक पंड्या

अष्टपैलू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) हा टी-20 कर्णधार होण्याचा सर्वात मोठा दावेदार आहे. जर त्याच्या नेट संपत्तीबद्दल बोलायचे झाल्यास, हार्दिकची एकूण संपत्ती 80 कोटी रुपये आहे. त्याच्या कमाईचा मुख्य स्त्रोत म्हणजे क्रिकेट आणि ब्रँड एंडोर्समेंट. दर महिन्याला सुमारे 1.25 कोटी रुपये कमावणाऱ्या हार्दिक पांड्याकडे अनेक आलिशान गाड्या आहेत. त्याच्याकडे 6.15 कोटी रुपयांच्या रोल्स रॉयस, 4 कोटी रुपयांच्या लॅम्बोर्गिनी, ऑडी आणि रेंज रोव्हरसारख्या आलिशान कार आहेत.

Team india
BCCI Will Review Team India: रोहित, विराट, द्रविड यांना बीसीसीआय घेणार फैलावर

ऋषभ पंत

एकूण संपत्तीच्या बाबतीत ऋषभ पंतही (Rishabh Pant) मागे नाही. त्याच्याकडे सुमारे 70 कोटींची संपत्ती आहे. ऋषभ पंतच्या खेळासाठी त्याचे चाहते उत्सुक आहेत. त्यामुळेच तो टी-20 च्या कर्णधारपदाचा प्रबळ दावेदार ठरु शकतो. 70 कोटींच्या मालमत्तेचा मालक असलेल्या ऋषभचे हरिद्वारमध्ये एक आलिशान घर आहे. याशिवाय त्याने अनेक ठिकाणी रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक केली आहे. अनुभवी क्रिकेटपटू असूनही त्याच्याकडे गाड्यांचा संग्रह कमी आहे. त्याच्याकडे मर्सिडीज एसयूव्ही आहे.

Team india
IND vs NZ : या महिन्यात रंगणार Team India आणि New Zealand मध्ये सामना; हे आहे वेळापत्रक

सूर्यकुमार यादव

टी-20 क्रमांक एकचा फलंदाज सूर्यकुमार यादवही (Suryakumar Yadav) कर्णधार होण्याच्या शर्यतीत सामील आहे. आगामी काळात भारताला विजय मिळवून देऊ शकतो. सूर्यकुमारचे मुंबईत आलिशान घर आहे. याशिवाय त्याच्याकडे देशभरात अनेक रिअल इस्टेट मालमत्ता आहेत. त्याच्या कार कलेक्शनमध्ये मर्सिडीजपासून बीएमडब्ल्यू आणि ऑडीपर्यंतच्या महागड्या कारचा समावेश आहे. त्याच्याकडे रेंज रोव्हर वेलार, मिनी कूपर एस आणि ऑडी ए6 देखील आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com