हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) आता बीसीसीआय (BCCI) आणि निवड समितीच्या नाराजीला देखील सामोरे जावे लागणार आहे
हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) आता बीसीसीआय (BCCI) आणि निवड समितीच्या नाराजीला देखील सामोरे जावे लागणार आहे Dainik Gomantak
क्रीडा

देशांतर्गत क्रिकेटमध्ये फाॅर्म दाखविला तरच संघात स्थान; BCCIचा पांड्याला समज

दैनिक गोमन्तक

आपल्या फॉर्ममुळे टीकेचा सामना करणाऱ्या हार्दिक पांड्याला आता बीसीसीआय (BCCI) आणि निवड समितीच्या नाराजीला देखील सामोरे जावे लागणार आहे. एका माध्यमाला बीसीसीआयच्या अधिकाऱ्याच्या दिलेल्या वृत्तानुसार, हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) न्यूझीलंडविरुद्धच्या (New Zealand) होम सीरिजमध्ये स्थान मिळणार नाही. बीसीसीआयच्या आणखी एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले की, हार्दिक पांड्या जोपर्यंत देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याचा फॉर्म आणि फिटनेस सिद्ध करत नाही तोपर्यंत त्याचा भारतीय संघात समावेश केला जाणार नाही.

नाव न सांगण्याच्या अटीवर एका अधिकाऱ्याने सांगितले, पंड्याला संघातून वगळण्यात आले आहे. जर त्याला संघात पुनरागमन करायचे असेल तर त्याआधी त्याला त्याचा फॉर्म आणि फिटनेस सिद्ध करावा लागेल. हार्दिक पांड्या फक्त एक फलंदाज म्हणून संघात बसत नाही. पांड्याला देशांतर्गत क्रिकेट खेळण्यास सांगण्यात येणार आहे. जर त्याचा संघात समावेश करायचा असेल तर त्याआधी त्याला त्या स्तरावर चांगली कामगिरी करावी लागेल.

अनेक दिग्गज भारतीय खेळाडूंनी म्हटले आहे की, आता पराभवातून धडा घेत बीसीसीआयने पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T20 विश्वचषकाची तयारी सुरू करावी. पुढील T20 विश्वचषक स्पर्धेसाठी केवळ एक वर्ष शिल्लक असताना, निवडकर्ते 4-5 वेगवान गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडू तयार करण्यास उत्सुक आहेत. 17 नोव्हेंबरपासून न्यूझीलंडविरुद्ध सुरू होणाऱ्या मालिकेसाठी निवडकर्त्यांनी हार्दिक पांड्याऐवजी व्यंकटेश अय्यरची निवड केली आहे.

हार्दिक पांड्याला का दाखवला बाहेरचा रस्ता?

बीसीसीआय हार्दिक पांड्याच्या तंदुरुस्ती आणि फॉर्मवर नाराज आहे. त्याला न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी मालिकेत स्थान मिळणार नाही. T20 विश्वचषकादरम्यान हार्दिक पंड्याचा फॉर्म आणि फिटनेस हा संघ व्यवस्थापनासाठी चिंतेचा विषय राहिला होता. पांड्या संघासाठी फलंदाजीत किंवा गोलंदाजीत योगदान देऊ शकला नाही. त्याने स्पर्धेत फक्त 4 षटके टाकली आणि पाच सामन्यात फक्त 69 धावा केल्या. आपल्या फॉर्ममुळे तंदुरुस्तीमुळे चर्चेत आलेला हार्दिक पांड्या अडचणींमध्ये आता आणखीनच भर पडली आहे. कारण बीसीसीआयने संघ व्यवस्थापन आणि निवड समितीकडून अहवाल मागवला आहे.

सुमारे आठवडाभरापूर्वी, बीसीसीआयच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने एका माध्यमाला दिलेल्या माहितीनुसार, निवड समिती आणि संघ व्यवस्थापनाकडून निश्चितपणे अहवाल मागवला जाईल आणि त्यात हार्दिक पांड्याचे नावही असेल. बीसीसीआय आणि निवड समितीने विश्वचषकासाठी हार्दिक पांड्यावर खूप विश्वास दाखवला होता, ज्याची त्याला किंमतही मोजावी लागली. दिग्गजांपासून माजी निवडकर्त्यांपर्यंत यावर प्रश्न उपस्थित करण्यात आले. आता हार्दिक पांड्या केवळ फलंदाज म्हणून संघात बसत नाही, असे निवडकर्त्यांचे मत आहे. पुढच्या प्लॅनबद्दल सांगायचे तर, आता त्या फलंदाजांना तयार करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे, जे चांगली गोलंदाजीही करू शकतात. त्यासाठी चार ते पाच खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे.

यावेळी बोलताना बीसीसीआयचा अधिकारी म्हणाला, ही केवळ एक किंवा दोन वेगवान गोलंदाज अष्टपैलूंची बाब नाही. हार्दिक पंड्याच्या जागी आमच्याकडे दुसरा कोणताही बॅकअप खेळाडू नव्हता आणि ही चिंतेची बाब होती. हार्दिकच्या अनुपस्थितीत आम्हाला ज्या खेळाडूची चाचणी घ्यायची होती, तोही आमच्या अपेक्षेनुसार ठरला नाही. आम्ही खेळाडूंपैकी एकाच्या बरे होण्याची प्रतीक्षा करू शकत नाही. संघाच्या खालच्या क्रमवारीत सुधारणा करू शकणारा वेगवान अष्टपैलू खेळाडू आम्हाला हवा आहे. राहुल, विराट, रोहित आणि निवड समितीला याची माहिती असून, या स्पर्धेतील वेगवान गोलंदाज अष्टपैलू खेळाडूंच्या कामगिरीवर निवड समिती मुश्ताक अली स्पर्धेवर लक्ष ठेवणार आहेत. 17 नोव्हेंबरपासून न्यूझीलंडविरुद्ध सुरू होणाऱ्या मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर करण्यात आला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai Goa Highway Traffic: मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी; झाड कोसळल्याने खोळंबा!

Goa Success Story: गणेश SSC पास हो गया! गोव्यातील वानरमारे समाजातील ठरला पहिलाच विद्यार्थी

Goa 11th Admission: अवाजवी शुल्क आकारल्यास तात्काळ कारवाई; CM सावंत यांचा विद्यालयांना इशारा

Yellow Alert In Goa: गोव्यात यलो अलर्ट, पुढील दोन दिवस महत्वाचे

Goa Drugs Case: इवल्याशा गोव्यात ड्रग्जचा सुळसुळाट; 3.8 कोटींचे अमली पदार्थ जप्त

SCROLL FOR NEXT