Online National Chess: Nitish Belurkar Dainik Gomantak
क्रीडा

Online National Chess: नीतिशचे सनसनाटी विजय

Online National Chess: लागोपाठ दोघा मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का

दैनिक गोमंतक

पणजी: ऑनलाईन राष्ट्रीय बुद्धिबळ (Online National Chess) स्पर्धेच्या सीनियर गटात मंगळवारी गोव्याचा फिडे मास्टर (Fide Master) नीतिश बेलुरकर (Nitish Belurkar) याने सनसनाटी विजय नोंदविले. त्याने लागोपाठ दोघा मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का देत गुणसंख्या साडेपाचवर नेली. नीतिशने अगोदर अव्वल मानांकित ग्रँडमास्टर अभिजित गुप्ता (एलो 2612) याला जबरदस्त धक्का दिला, नंतर पाचवा मानांकित ग्रँडमास्टर हर्ष भारतकोटी (एलो 2509) यालाही पराजित केले. नीतिश आता क्रमवारीत तेराव्या स्थानी आहे.

अन्य गोमंतकीय खेळाडूंत ऋत्विज परब यानेही धक्कादायक विजयाची नोंद केली. त्याने ग्रँडमास्टर पी. इनियान (एलो 2506) याला नमविले. ऋत्विजचे साडेचार गुण झाले आहेत. गोव्याचा इंटरनॅशनल मास्टर अमेय अवदी याच्या खाती पाच गुण आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Opinion: संपूर्ण गोव्याचे, गोवेकरांच्या अस्तित्वाचे, मुलाबाळांच्या भवितव्याचे प्रश्न कोण विचारणार?

Weekly Horoscope: जाणून घ्या येणाऱ्या आठवड्यातील ग्रह-नक्षत्रांची स्थिती; काही राशींना शुभ, तर काहींना सतर्कतेचा इशारा

Mapusa Fire Incident: म्हापशात आगीचे थैमान, शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना; 3 लाखांचे नुकसान

Goa Live News: मॅन्ग्रोव्ह डे निमित्त, सरकारी हायस्कूल मर्सेसने 'मातृशक्ती क्लब'चे केले उद्घाटन

Thailand Cambodia Conflict: 32 ठार, 58 हजार स्थलांतरीत; थायलंड-कंबोडिया सीमेवरील तणाव, न्यूयॉर्कमध्ये बंद दाराआड बैठक

SCROLL FOR NEXT