Jatinder Singh Dainik Gomantak
क्रीडा

ओमानच्या 'या' क्रिकेटपटूचा परिवार टीम इंडियाला करतोय चीयर

दैनिक गोमन्तक

ओमानने (Oman) टी -20 विश्वचषकाच्या (T20 World Cup) पहिल्या सामन्यात पीएनजीला (PNG) हरवून विजयासह मोहिमेची सुरुवात केली. जतिंदर सिंगने (Jatinder Singh) ओमानसाठी अर्धशतकी खेळी खेळून संघाचा विजय निश्चित केला. लुधियानामध्ये जन्मलेला जतिंदर सिंगचा परिवार टीम इंडियासाठी तसेच ओमानसाठी चीयर करत आहे. जतिंदरसाठी हा अतिशय खास क्षण आहे. सचिन-सेहवागसारखे फलंदाज होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या या क्रिकेटपटूचे वडील सुतारकाम करतात. जतिंदरने क्रिकेटपटू होण्याचे स्वप्न पाहिले आणि आज तो ते स्वप्न जगत आहे.

जतिंदरसिंगचे वडील 1975 साली लुधियानामधून ओमानमध्ये स्थायिक झाले होते. तेथे त्यांनी रॉयल ओमान पोलिसमध्ये सुतार म्हणून काम करण्यास सुरुवात केली. यानंतर, 2003 मध्ये जतिंदर आपली आई आणि तीन भावंडांसह ओमानला गेला. यानंतर, पुढच्या वर्षी तो मस्कतमध्ये इंडियन स्कूल क्रिकेट संघाचा एक भाग बनला. 2007 मध्ये, तो 19 वर्षांखालील क्रिकेट खेळणारा सर्वात तरुण खेळाडू होता. यानंतर तो गल्फ क्रिकेट, एमहेंस क्रिकेट आणि अरेबियन इंडस्ट्रीसाठी क्रिकेट खेळला.

जतिंदर नोकरीसह क्रिकेट खेळतो

त्याने आयसीसी लीग 2 मध्ये टी -20 पदार्पण केले. यानंतर, 2015 मध्ये त्याने अफगाणिस्तानविरुद्ध आंतरराष्ट्रीय टी 20 पदार्पण केले. भारतातील त्याच्या अनुभाविषयी सांगताना म्हटले की, 'मी भारतात रहात असतानाही स्ट्रीट क्रिकेट खेळायचो. मला सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) यांची फलंदाजी पाहणे आवडायचे. मात्र, मस्कतमध्ये आल्यानंतर मी ते गांभीर्याने घ्यायला सुरुवात केली. तथापि, खेळाडूंना मस्कटमध्ये कॉर्पोरेट स्तरावर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर तेवढे पैसे मिळत नाहीत. 2014 मध्ये मी त्याच्यासाठी खिमजी इंडस्ट्रीमध्ये नोकरी घेऊन क्रिकेट खेळायला सुरुवात केली. मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करतो त्यानंतर मी सराव सत्रांमध्ये भाग घेतो.

शिखर धवनच्या शैलीत साजरा करतो आनंद

विश्वचषक खेळण्याबाबत तो म्हणाला, 'मी दुसऱ्या टी -20 विश्वचषकात भाग घेतला, हे माझ्यासह संपूर्ण संघाचे स्वप्न होते. मी भारतात आलो होतो पण कोविडच्या दुसऱ्या लाटेमुळे परत येऊ शकलो नाही. त्या काळात मी सीपी क्रिकेट मैदानावर सराव केला. त्यानंतर मला मस्कतला जाण्यासाठी एक विशेष विमान सेवा मिळाली. मी पीएनजीविरुद्ध अर्धशतक केल्यानंतर शिखर धवनच्या शैलीत आनंद साजरा करोत. मला माहित आहे की, भारतातील माझे कुटुंब टीम इंडियाबरोबर माझाही उत्साह वाढवतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT