32 वर्षांनी ऑलिंपिक पुन्हा ऑस्ट्रेलिया होणार आहे. Dainik Gomantak
क्रीडा

Olympics 2032: 32 वर्षानंतर ऑस्ट्रेलियात ऑलिंपिकचे बिगुल वाजणार

सिडनीमध्ये 2000 साली ऑलिंपिकचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर 32 वर्षांनी ऑलिंपिक (Olympics after 32 years) पुन्हा ऑस्ट्रेलिया होणार आहे. या आधी 1956 मध्ये ऑलिंपिकचे आयोजन मेलबर्नमध्ये झाले होते.

दैनिक गोमन्तक

टोकियो: Olympics 2032 चे आयोजन ऑस्ट्रेलियात (Australia) होणार आहे. 32 सालानंतर ऑलिंपिक (Olympics after 32 years) गेम्स ब्रिसबेनमध्ये (Brisbane) होणार आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती (IOC) ने 2032 ला बुधवारी ब्रिसबेनला पसंती दिली आहे. ब्रिसबेनसोबत अनेक शहरांनी ऑलिंपिकसाठी दावेदारी सादर केली होती. यासाठी घेण्यात आलेल्या मतदानामध्ये ब्रिसबेनला 72-5 असे मतदान झाले. ऑलिंपिकची यजमानपद मिळल्यावर मौरिसनने दोन्ही हाथवर जिंकण्याची मुद्रा दाखविला.

सिडनीमध्ये 2000 साली ऑलिंपिकचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर 32 वर्षांनी ऑलिंपिक पुन्हा ऑस्ट्रेलिया होणार आहे. या आधी 1956 मध्ये ऑलिंपिकचे आयोजन मेलबर्नमध्ये झाले होते. ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री स्कॉट मॉरिसन यांनी आपल्या कार्यालयातून IOC च्या मतदारांशी 11 मिनिट संवाद साधला. यामध्ये ते म्हणाले, खेळाच्या यशस्वी आयोजनासाठी काय करावयाचे ते आम्हाला चांगले माहिती आहे. ऑलिंपिकच्या आयोजनाचा बहुमान मिळाल्यामुळे ब्रिसबेनमध्ये आतिशबाजी करण्यात आली. ब्रिसबेनच्या आधी 2028 ला ऑलिंपिक लॉस ऐंजलिसमध्ये होईल तर 2024 ला पॅरिसमध्ये ऑलिंपिक होणार आहे.

IOC ने फेब्रुवारीत ब्रिसबेनला बोलण्याचा विशेष आधिकार दिला आहे. ऑलिंपिकचे यजमान पद मिळण्याची अपेक्षा ब्रिसबेनला होतीच. ऑलिंपिक स्पर्धेचे आयोजन संपूर्ण क्विंसलँडमध्ये करण्यात येईल. ब्रिसबेनमधील गाबा क्रिकेट स्टेडियमचे अधुनिकीकरण करण्यात येणार आहे. क्रिकेट खेळ ऑलिंपिकमध्ये फक्त एकदाच 1900 साली खेळण्यात आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rohit Sharma Video: "रोहित भाई..वडा पाव खाओगे क्या?" चाहत्याच्या प्रश्नावर 'हिटमॅन'नं दिलं मजेशीर उत्तर, पाहा व्हिडिओ

Goa Municipal Elections: 11 नगरपालिका आणि पणजी महापालिकेसाठी रणधुमाळी! मार्च-एप्रिलमध्ये निवडणुकीचा धमाका

Goa Politics: अमित पालेकरांना 'आप' प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवलं! "वापरा आणि फेकून द्या" काँग्रेसने लगावला टोला

Margao: विद्युत रोषणाईने मडगाव शहर उजळले, गोमंतकीयांमध्ये नाताळचा उत्साह; बाजारपेठा साहित्याने सजल्या; खरेदीसाठी उडतेय झुंबड

Mahavir Sanctuary: महावीर अभयारण्यात होणार खनिज हाताळणी, वनजमिनीचा वापर करण्यास परवानगी; पर्यावरणवाद्यांना धक्का

SCROLL FOR NEXT