Goa Women Cricket Team runner-up In Chhattisgarh Women’s T20 Cup 2023 Dainik Gomantak
क्रीडा

Chhattisgarh Women’s T20 Cup 2023: छत्तीसगड टी-20 स्पर्धेत गोव्याच्या महिलांना अखेर उपविजेतेपद

अंतिम लढतीत विदर्भाचा संघ ठरला भारी

किशोर पेटकर

Chhattisgarh Women’s T20 Cup 2023: साखळी फेरीत पाचही सामने जिंकलेला गोव्याचा महिला क्रिकेट संघ अखेर महत्त्वाच्या अंतिम लढतीत अडखळला, त्यामुळे छत्तीसगड महिला टी-२० कप क्रिकेट स्पर्धेत त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. विदर्भाने आठ विकेट राखून दणदणीत विजय नोंदवत विजेतेपद पटकावले.

छत्तीसगड राज्य क्रिकेट संघातर्फे घेण्यात आलेल्या स्पर्धेतील अंतिम सामना सोमवारी रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झाला.

गोव्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली, पण विदर्भाने त्यांना मोठी धावसंख्या उभारू दिली नाही. २० षटकांत त्यांना ५ बाद ११८ धावांचीच मजल मारता आली.

शिखा पांडे हिने सलग दुसऱ्या सामन्यात अर्धशतक केल्यामुळे गोव्याला १२.२ षटकांतील ४ बाद ५६ वरून शतकी वेस पार करता आली. शिखाने ४० चेंडूंत सहा चौकार व एका षटकाराच्या मदतीने नाबाद ५० धावा केल्या.

नंतर शिवानी धर्णे (४८) व भारती फुलमाळी (६४) यांनी तिसऱ्या विकेटसाठी केलेल्या १०४ धावांच्या अभेद्य भागीदारीमुळे विदर्भाने फक्त दोन विकेट गमावून १७.५ षटकांतच सामना जिंकला. गोव्याची अष्टपैलू तरन्नुम पठाण स्पर्धेची मानकरी ठरली.

संक्षिप्त धावफलक

गोवा महिला: २० षटकांत ५ बाद ११८ (पूर्वजा वेर्लेकर ८, तरन्नुम पठाण १२, सुनंदा येत्रेकर ६, संजुला नाईक १६, शिखा पांडे नाबाद ५०, विनवी गुरव १७, पूर्वा भाईडकर नाबाद १, कोमल झांझड ४-०-२३-२) पराभूत

वि. विदर्भ: १७.५ षटकांत २ बाद १२२ (शिवानी धर्णे नाबाद ४८, भारती फुलमाळी नाबाद ६४, शिखा पांडे ३-०-२३-१, पूर्वा भाईडकर ३-०-१९-१, तरन्नुम पठाण ३-०-१५-०, प्रियांका कौशल ३-०-२३-०, दीक्षा गावडे ३-०-१६-०, तनया नाईक १.५-०-१३-०, सुनंदा येत्रेकर १-०-९-०).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: ''...तर आज इस्रायलचे अस्तित्वच नसते'' लेबनॉनमधील कारवाईवरुन ट्रम्प यांचे खळबळजनक वक्तव्य; नेतन्याहूंच्या युद्धनीतीवर सवाल

FIFA World Cup 2026: उरुग्वेकडून खेळतोय 'गोव्या'शी नातं असलेला खेळाडू; सौदी अरेबियाविरुद्ध केला निर्णायक गोल, कोण आहे Maximiliano Araujo?

Goa Village News: उसगाव-गांजेतील घरपट्टी शुल्कात होणार कपात; विशेष ग्रामसभेत ठराव संमत, गरिबांना होणार लाभ

Mayem Kayaking Service: मये तलावात 'कायाकिंग' बोटिंग सेवा सुरू

Emergency Health Services: आपत्कालीन आरोग्य सेवा होणार अधिक सक्षम; 24 तास नियंत्रण कक्ष उभारण्याचा प्रस्ताव, 108 सेवेचा सखोल आढावा

SCROLL FOR NEXT