Indian Super League | Odisha
Indian Super League | Odisha Dainik Gomantak
क्रीडा

Indian Super League : ओडिशाचा केरळा ब्लास्टर्सवर पिछाडीवरून झुंजार विजय

गोमन्तक डिजिटल टीम

Indian Super League : ओडिशा एफसीने रविवारी रात्री इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत पिछाडीवरून झुंजार विजय नोंदविला. भुवनेश्वर येथील कलिंगा स्टेडियमवर झालेल्या लढतीत शेवटची चार मिनिटे बाकी असताना बदली स्पॅनिश खेळाडू पेद्रो मार्टिन याने नोंदविलेला गोल यजमान संघासाठी निर्णायक ठरला, त्यामुळे त्यांना केरळा ब्लास्टर्सवर 2-1 फरकाने विजय नोंदविणे शक्य झाले.

सामन्याच्या 35 व्या मिनिटास हरमनज्योत खब्रा याने केरळा ब्लास्टर्सला आघाडी मिळवून दिली. विश्रांतीला केरळचा संघ एका गोलने आघाडीवर होता. 54 व्या मिनिटास जेरी माविमिंगथांगा याने ओडिशा एफसीला 1-1 अशी बरोबरी साधून दिली. नंतर 86 व्या मिनिटास पेद्रो याने नोंदविलेल्या गोलमुळे ओडिशाने स्पर्धेतील दुसऱ्या विजयाची नोंद केली. त्यांचे आता तीन लढतीनंतर सहा गुण झाले आहेत. गुणतक्‍त्यात त्यांना तिसरा क्रमांक मिळाला आहे.

एफसी गोवाचेही सहा गुण आहेत, गोलसरासरी सरस असल्याने ते दुसऱ्या स्थानी कायम राहिले. केरळा ब्लास्टर्सला सलग दुसरा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे त्यांचे तीन लढतीनंतर तीन गुण कायम राहिले व नवव्या क्रमांकावर घसरण झाली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa BJP: प्रतापसिंह राणे यांचा श्रीपादना पाठिंबा, मी संघाची विचारधारा स्वीकारली; विश्वजीत राणे

Goa Today's Top News : राणेंचा गौप्यस्फोट, लोकसभा, राजकारण, अपघात; राज्यातील ठळक बातम्या एका क्लिकवर

Workers March Goa: पोटावर लाथ मारणारे सरकार हवे कशाला? फार्मा कंपन्यांवरील एस्मा मागे घ्या; पणजीत कामगारांचा एल्गार

Zero Shadow Day: सावली गोमन्तकीयांची साथ सोडणार; राज्यात अनुभवता येणार झिरो शाडो

Goa News: गोव्यात वेश्याव्यवसायिक 12 महिलांना मिळाला मतदानाचा अधिकार

SCROLL FOR NEXT