Super Cup Football Tournament Dainik Gomantak
क्रीडा

Super Cup Football Tournament: एफसी गोवाचे आव्हान संपुष्टात; निसटत्या विजयासह ओडिशा FC ने गाठली उपांत्य फेरी

Super Cup Football Tournament: एफसी गोवाने सुपर कप फुटबॉल स्पर्धेच्या ‘ड’ गटात कडवी झुंज दिली.

किशोर पेटकर

Super Cup Football Tournament: एफसी गोवाने सुपर कप फुटबॉल स्पर्धेच्या ‘ड’ गटात कडवी झुंज दिली, परंतु उत्तरार्धातील 16 मिनिटांत तीन गोल नोंदवलेल्या ओडिशा एफसीने 3-2 अशा निसटत्या विजयासह उपांत्य फेरी गाठली. गोव्याच्या संघाचे या निकालासह स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले, तसेच मोसमातील अपराजित मालिकाही भंगली.

दरम्यान, भुवनेश्वर येथील कलिंगा स्टेडियमवर ग्रुप स्टेजमधील महत्त्वाचा साखळी सामना सोमवारी झाला. उपांत्य फेरीसाठी ओडिशाला बरोबरी हवी होती, तर एफसी गोवासाठी विजय अत्यावश्यक होता. सामन्याचा पूर्वार्ध गोलशून्य बरोबरीत राहिल्यानंतर उत्तरार्ध अटीतटीचा ठरला. ओडिशाने लागोपाठ तीन गोल केले. अहमद जाहौ याने 51 व्या मिनिटास पेनल्टी फटक्यावर गोलशून्य बरोबरीची कोंडी फोडल्यानंतर मोर्तदा फाल याने अनुक्रमे 62 आणि 76 व्या मिनिटास गोल करुन ओडिशाला 3-0 अशी मजबूत आघाडी मिळवून दिली. मात्र एफसी गोवाने लगेच नमते घेतले नाही. कार्लोस मार्टिनेझने अनुक्रमे 76 आणि 86 व्या मिनिटास गोल करुन मानोलो मार्केझ यांच्या मार्गदर्शनाखालील संघाची पिछाडी 3-2 अशी कमी केली.

मोसमातील पहिला पराभव

दरम्यान, ओडिशाचा हा ड गटातील सलग तिसरा विजय ठरला. त्यांचे सर्वाधिक नऊ गुण झाले. एफसी गोवा दोन विजय आणि एका पराभवासह गटात सहा गुण नोंदवून दुसऱ्या स्थानी राहिला. मोसमात सलग 12 सामने (आयएसएलमध्ये 10, सुपर कपमध्ये 2) अपराजित राहिलेल्या एफसी गोवाची मालिका सोमवारच्या पराभवाने खंडित झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Tourism: जोडीदारासह 'निवांत' ठिकाणी जायचंय? गोवा ठरेल रोमँटिक गेटवे, वाचा परफेक्ट टूर गाईड

Gold Theft Case: नामवंत ज्वेलरी शोरुममधून लंपास केलं 2.5 कोटींचं सोनं, चोरीच्या पैशांतून घेतली कोट्यवधींची मालमत्ता, लखनौच्या 'कोमल'चा पर्दाफाश!

प्रतीक्षा संपली! रोनाल्डो FC गोवाशी भिडणार; कधी अन् कुठे रंगणार सामना? जाणून घ्या सर्व माहिती

Virat Kohli Net Worth: लक्झरी लाईफस्टाईल, ब्रँड एंडोर्समेंटमधून कोट्यवधींची कमाई, आलिशान कारचं कलेक्शन; किंग कोहलीची नेटवर्थ ऐकून व्हाल थक्क!

डिजिटल क्षेत्रात 'WISE' ची क्रांती! बातमी निर्मिती आता होणार 'सुपरफास्ट'; Oneindia ने विकसित केला नवा AI प्लॅटफॉर्म

SCROLL FOR NEXT