Odisha FC Dainik Gomantak
क्रीडा

Indian Super League: ओडिशा एफसीने नॉर्थईस्ट युनायटेडचा उडविला धुव्वा

कोविडमुळे उद्भवलेल्या प्रतिकुल परिस्थितीत आठव्या इंडियन सुपर लीग (Indian Super League) फुटबॉल स्पर्धेत सलग तीन दिवस सामने झाले नाहीत.

किशोर पेटकर

पणजी : कोविडमुळे उद्भवलेल्या प्रतिकुल परिस्थितीत आठव्या इंडियन सुपर लीग (Indian Super League) फुटबॉल स्पर्धेत सलग तीन दिवस सामने झाले नाहीत. मंगळवारी अखेर लढत झाली आणि प्रशिक्षक बदललेल्या ओडिशा एफसीने (Odisha FC) बाजी मारली. पूर्वार्धातील दोन गोलच्या बळावर त्यांनी नॉर्थईस्ट युनायटेडला (Northeast United) 2-0 फरकाने हरविले.

अनिश्चिततेच्या वातावरणात सामना फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झाला. डॅनियल लाल्हलिम्पुईया याने 17व्या मिनिटास, तर स्पॅनिश अरिदाय सुवारेझ याने 22व्या मिनिटास केलेल्या गोलमुळे ओडिशा एफसीने 11 लढतीतील पाचव्या विजयाची नोंद केली. त्यांचे आता 16 गुण झाले असून आता पाचव्या क्रमांकावर उडी घेतली.

खालिद जमिल यांच्या मार्गदर्शनाखालील नॉर्थईस्ट युनायटेडचे निकालाबाबत अपयश कायम राहिले. त्यांना 12 लढतीत सातवा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे नऊ गुण आणि दहावा क्रमांक कायम राहिला. पहिल्या टप्प्यातही ओडिशाने नॉर्थईस्टला एका गोलने हरविले होते.

स्पॅनिश प्रशिक्षक किको रमिरेझ यांना डच्चू दिल्यानंतर ओडिशा एफसीचा हा आयएसएल स्पर्धेतील पहिलाच सामना होता. भुवनेश्वरमधील संघाची सुरवात सकारात्मक ठरली. सुवारेझच्या असिस्टवर डॅनियल लाल्हलिम्पुईया याने नेटसमोर कोणीच नसल्याची संधी साधली. डॅनियलचा हा यंदा स्पर्धेतील पहिलाच, तर आयएसएलमधील एकंदरीत पाचवा गोल ठरला.

आघाडी घेतल्यानंतर लगेच अरिदाय याने मोसमातील वैयक्तिक पाचवा गोल नोंदविल्यामुळे ओडिशाची आघाडी वाढली. हावी हर्नांडेझच्या असिस्टवर 33 वर्षीय स्पॅनिश खेळाडूने शानदार गोल केला. यावेळी नॉर्थईस्ट युनायटेडचा गोलरक्षक मिर्शाद मिचू चेंडू अडविण्यासाठी झेपावला, पण यशस्वी ठरला नाही. नॉर्थईस्टला सामन्यात पिछाडी भरून काढण्याची संधी होती, पण त्यांची नेमबाजी अचूक ठरू शकली नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोव्यानं नोंदवला सलग चौथा विजय; मोहितच्या गोलंदाजीसमोर मिझोरामचा संघ ढेर!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Onion Rates: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दोन दिवसात दरांमध्ये तब्बल २० रुपयांनी वाढ, जाणून घ्या सध्याचा भाव

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; डिचोलीतील चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

SCROLL FOR NEXT