World Cup 2023
World Cup 2023 Dainik Gomantak
क्रीडा

ICC World Cup 2023 स्पर्धेच्या तारखा ठरल्या? भारतातील 'या' 12 शहरांमध्ये रंगणार थरार...

Pranali Kodre

ICC World Cup 2023: भारतात यावर्षी आयसीसी वनडे वर्ल्डकप खेळवला जाणार आहे. मात्र अद्याप आयसीसी किंवा बीसीसीआयकडून या स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झालेले नाही. पण आता संभाव्य तारखा आणि ठिकाणे समोर आली आहेत.

एकूण 10 संघात होणारा हा वर्ल्डकप भारतात 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर या दरम्यान होण्याची दाट शक्यता आहे. तसेच एकूण 12 ठिकाणांवर या वर्ल्डकपमधील सामने होऊ शकतात.

इएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या माहितीनुसार या वर्ल्डकपचा अंतिम सामना 19 नोव्हेंबरला जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियमवर म्हणजेच अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियवर खेळवला जाऊ शकतो.

अहमदाबादशिवाय या वर्ल्डकपमधील सामने बेंगळुरू, चेन्नई, दिल्ली, धरमशाला, गुवाहाटी, हैदराबाद, कोलकाता, लखनऊ, इंदोर, राजकोट आणि मुंबई या शहरांमध्ये होऊ शकतात. वर्ल्डकप 2023 स्पर्धा एकूण 46 दिवस चालणार असून एकूण 48 सामने या स्पर्धेत खेळवले जाणार आहेत. यामध्ये तीन बाद फेरीचे सामने देखील असणार आहेत.

दरम्यान, अद्याप याबद्दल बीसीसीआय किंवा आयसीसीकडून याबद्दल कोणतीही पृष्टी करण्यात आलेली नाही. खरंतर आयसीसीकडून कोणत्याही स्पर्धेचे साधारणत: एक वर्षांपूर्वीच वेळापत्रक घोषित केले जाते. मात्र, सध्या बीसीसीआयला काही गरजेच्या परवानग्या भारतीय सरकारकडून मिळणे बाकी असल्याचे हे वेळापत्रक जाहीर करण्यात उशीर होत असल्याची शक्यता आहे.

सध्या स्पर्धेसाठी कर सूट मिळण्याबाबत आणि पाकिस्तानी खेळाडूंचा व्हिसा या प्रकरणांबाबत भारतीय सरकारची परवानगी येणे बाकी आहे. त्यामुळे काही परवानग्या मिळाल्यानंतर हे वेळापत्रक घोषित होण्याची शक्यता आहे.

या स्पर्धेत वर्ल्डकप सुपर लीग स्पर्धेअंतर्गत झालेल्या मालिकांच्या क्रमवारीनुसार पहिल्या 8 क्रमांकावरील संघ थेट 2023 वर्ल्डकपसाठी पात्र ठरणार आहेत. तर उर्वरित 5 संघांना अन्य 5 सहसदस्य संघांविरुद्ध पात्रता फेरी खेळावी लागणार आहे.

यातून अव्वल 2 संघ वर्ल्डकप खेळण्यासाठी पात्र ठरतील. असे एकूण 10 संघात ही स्पर्धा रंगणार आहे. लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की भारतीय संघ आयोजक असल्याने या वर्ल्डकपसाठी थेट पात्र ठरला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dabolim Airport: भारतीय नौदलाच्या विमानाचे दाबोळीवर आपत्कालीन लँडिंग, चार फ्लाईट्स वळवल्या

Pernem News : पेडणे तालुक्यातील रस्त्यांची ‘वाट’; रस्ते पावसाळ्यापूर्वी तरी दुरुस्त होतील का

Goa Today's Live News: मडगाव येथे अपघातात एक ठार, एक जखमी

Bicholim Volleyball League : सर्वण येथे व्हॉलिबॉल लीगला सुरवात; आठ संघांचा सहभाग

Goa Traffic Violations: वाहतूक उल्लंघन ; चार महिन्यांत ९ कोटींचा दंड वसूल

SCROLL FOR NEXT