Novak Djokovic Dainik Gomantak
क्रीडा

US Open 2023: जोकोविचने रचला इतिहास, मेदवेदेवला पराभूत करत जिंकले 24 वे ग्रँडस्लॅम

Novak Djokovic: नोवाक जोकोविचने अमेरिकन ओपनच्या फायनलमध्ये डॅनिल मेदवेदेवचा पराभव करत २४ वे ग्रँडस्लॅम जिंकण्याचा पराक्रम केला.

Pranali Kodre

Novak Djokovic won 24th Grand Slam:

सार्बियाचा दिग्गज टेनिसपटू नोवाक जोकोविचने रविवारी इतिहास रचला आहे. त्याने अमेरिकन ओपन 2023 स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात तिसऱ्या मानांकित डॅनिल मेदवेदेवला पराभूत करत विजेतेपद पटकावले. हे त्याचे कारकिर्दीतील 24 वे ग्रँडस्लॅम विजेतेपद ठरले.

त्यामुळे जोकोविचने एकेरीत सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकण्याच्या मार्गारेट कोर्टच्या 24 ग्रँडस्लॅम विजेतेपदांच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. जोकोविच सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकणारा पुरुष टेनिसपटू आहे.

जोकोविचने रविवारी मेदवेदेवला 6-3 7-6(5) 6-3 अशा फरकाने तीन सेटमध्ये पराभूत केले आणि चौथ्यांदा अमेरिकन ओपनच्या ट्रॉफीवरही नाव कोरले. यापूर्वी त्याने 2011, 2015 आणि 2018 साली अमेरिकन ओपन स्पर्धा जिंकली आहे.

सामन्यानंतर जोकोविच म्हणाला, 'मला माहित नाही, मी कुठून सुरुवात करू, कारण हेच माझ्यासाठी जग आहे. मी माझे बालपणीचे स्वप्न जगत आहे. खेळाच्या सर्वोच्च स्तरावर स्पर्धा करत आहे, ज्या खेळाने माझ्य कुटुंबाला खूप काही दिले आहे.'

'90च्या दशकात आमच्या देशात खूप युद्ध झाली आणि माझ्या कुटुंबाने खूप त्यागही केला. त्यांनी मला हा महागडा खेळही खेळू दिला. मी या खेळाच्या प्रेमात पडलो, जो खेळ माझ्या कुटुंबातील कोणीही यापूर्वी खेळला नव्हता. माझ्या पालकांनी दाखवलेला हा अविश्वसनीय विश्वास होता. ही ट्रॉफी माझ्या मुलांसाठी आणि माझ्या टीमसाठी आहे.'

तसेच जोकोविचने असेही म्हटले की 'इतिहास घडवणे हे खूप विशेष आणि शानदार आहे. मी ७-८ वर्षाचा असताना माझे स्वप्न होते की जगातील सर्वोत्तम खेळाडू बनायचे आणि विम्बल्डन जिंकायचे. गेल्या काही वर्षात मला वाटते मला इतिहास घडवण्याची संधी होती आणि जर ती मिळत असेल, तर का घेऊ नये.'

याशिवाय त्याने प्रतिस्पर्धी मेदवेदेवचेही कौतुक केले. तसेच सामन्यानंतर मेदवेदेवनेही जोकोविच आणि त्याच्या टीमचे अभिनंदन केले.

दरम्यान सामन्याबद्दल सांगायचे झाल्यास जोकोविचने पहिला सेट सहज 6-3 अशा फरकाने जिंकला होता, पण मेदवेदेवने दुसऱ्या सेटमध्ये दमदार पुनरागमन करत हा सेट टायब्रेकरमध्ये नेला.

मात्र जोकोविचने टायब्रेकर 7-5 असा जिंकला आणि सामन्यातही आघाडी घेतली. तिसऱ्या सेटमध्येही जोकोविचने मेदवेदेवला फारशी संधी दिली नाही आणि सेट जिंकत सामनाही आपल्या नावावर केला.

जोकोविचची 24 ग्रँडस्लॅम

जोकोविचने त्याच्या कारकिर्दीत 4 अमेरिकन ओपन, 10 ऑस्ट्रेलियन ओपन, 3 फ्रेंच ओपन आणि 7 विम्बल्डन अशी मिळून एकूण 24 ग्रँडस्लॅम विजेतीपदे जिंकली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: विधानसभा तिकीटासाठी 4 कोटींची बोली? खर्गेंच्या हॉटेल बिलावरूनही ग्रासियस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप

AC Compressor Blast: पाकिस्तान हादरलं! रुग्णालयात एसी कॉम्प्रेसरचा भीषण स्फोट, 15 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू; पालकांचा काळीज पिळवटणारा आक्रोश VIDEO

खरी कुजबुज: धो धो आश्वासने!

Goa Crime: 'त्या' नराधम बापाला कोर्टाचा मोठा दणका! अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी ठोठावली 20 वर्षांची शिक्षा; 1.30 लाखांचा दंड

Telangana Accident: किंकाळ्या अन् आक्रोश! अनियंत्रित बसची कंटेनरला जोरदार धडक, 6 ठार, 20 जखमी; तेलंगणात भीषण अपघात

SCROLL FOR NEXT