Controversial Moments In FIFA WC Dainik Gomantak
क्रीडा

Controversial Moments In FIFA WC: केवळ मॅराडोनाचा 'हँड ऑफ गॉड'च नाही; तर 'हे' क्षणही फिफा वर्ल्डकपमध्ये ठरले वादग्रस्त

उरूग्वेच्या सुआरेझने इटलीच्या खेळाडुला घेतला होता चावा; झिदानची ढुशीही गाजली

Akshay Nirmale

Controversial Moments In FIFA WC: फिफा वर्ल्डकपचा धमाका 20 नोव्हेंबरपासून कतारमध्ये होणार आहे. दर चार वर्षांनी खेळवण्यात येणाऱ्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. याच पार्श्वभूमीवर आतापर्यंत झालेल्या वर्ल्डकपच्या इतिहासातील वादग्रस्त क्षणांवर टाकलेला हा प्रकाशझोत...

Diego Maradona's Hand of God

मॅराडोनाचा हँड ऑफ गॉड

मेक्सिको येथे 1986 मध्ये फुटबॉल विश्‍वकरंडक फक्त आणि फक्त अर्जेंटिनाच्या दिएगो मॅराडोना याच्यासाठीच ओळखला जातो. त्याच्या अफाट आणि अद्वितीय कौशल्यामुळे अर्जेंटिनाने दुसऱ्यांदा विश्‍वविजेतेपदावर मोहोर उमटवली. 22 जून रोजी अर्जेंटिना - इंग्लंड यांच्यामध्ये उपांत्यपूर्व फेरीची लढत रंगली. त्यातील पहिला गोल हा 51 व्या मिनिटाला झाला. हा गोल फुटबॉलच नव्हे तर क्रीडा इतिहासात ‘हँड ऑफ गॉड’ या नावाने ओळखला जातो. इंग्लंड संघाचे प्रशिक्षक बॉबी रॉबसन यांनी विंगर न खेळवल्यामुळे मॅराडोना यांना पुढे जायला जागा मिळाली. स्टीव हॉग याला चकवत मॅराडोना पुढे गेले. त्यानंतर पेनल्टी बॉक्समध्ये इंग्लंडचा गोलकीपर पीटर शिल्टन व मॅराडोना एकमेकांना भिडले. मॅराडोना यांची उंची कमी असल्यामुळे उडी मारताना त्यांचा हात फुटबॉलला लागला आणि गोलजाळ्यात अडकला. पण हे मैदानातील पंचांना दिसले नाही. अर्जेंटिनाला गोल बहाल करण्यात आला. बॉबी रॉबसन यांनी मॅराडोना यांच्या त्या गोलवर टीका केली. पण त्यानंतर चारच मिनिटांमध्ये मॅराडोना यांनी इंग्लंडच्या चार खेळाडूंना व गोलरक्षकाला चकवत शतकातील सर्वोत्तम गोल केला आणि अर्जेंटिनाला इंग्लंडवर 2-0 असा विजय मिळवून दिला.

उरुग्वेच्या सुआरेझचा इटलीच्या किलीनीला चावा

ब्राझीलमध्ये 2014 मध्ये झालेल्या विश्‍वकरंडक स्पर्धेत ही घटना घडली. ‘ड’ गटामध्ये गटातील अखेरच्या साखळी फेरीत उरुग्वे व इटली सामन्यात उरूग्वेच्या लुईस सुआरेझ याने इटलीच्या जिऑर्जिओ किलीनीच्या खांद्याचा चावा घेतला होता. उरुग्वेने ही लढत जिंकून बाद फेरीत प्रवेश केला. पण सुआरेझवर ‘फिफा’ने नऊ सामन्यांची बंदी घातली. तसेच चार महिने फुटबॉलशी संबंधित सर्व बाबींपासून त्याला दूर केले.

Luis Suarez Bites
Zindedine Zidane Headbutt

झिदानची मॅटेराझीला ढुशी (हेडबट)

2006 मधील जर्मनी येथील वर्ल्डकपमध्ये फ्रान्सने इटलीवर 1-0 अशी आघाडी घेतली होती. पण मार्को मॅटेराझी याने हेडरवर अप्रतिम गोल करीत इटलीला बरोबरी साधून दिली. यानंतर मॅटेराझी याने फ्रान्सच्या झिनेदिन झिदानला उद्देशून अपशब्द काढले. त्यामुळे संतापलेल्या झिदानने मैदानातच मॅटेराझी याला हेडबट अर्थातच डोक्याने छातीवर जोरात ढुशी मारली. झिदानची ही धडकही चर्चेची ठरली होती. झिदानला त्याक्षणी मैदानाबाहेर काढण्यात आले. इटलीने ही लढत पेनल्टी शूटआऊटमध्ये 5-3 अशी जिंकली आणि जेतेपदावरही मोहोर उमटवली.

रेफ्रींचा संशयास्पद निर्णय

आशिया खंडात पहिल्यांदाच 2002 मध्ये दक्षिण कोरिया व जपानने फिफा वर्ल्डकप आयोजित केला. वर्ल्डकपमध्ये अंतिम 16 फेरीतील लढत इटली आणि दक्षिण कोरिया यांच्यामध्ये रंगली. इटलीच्या ख्रिस्तीयन विअरी याने परफेक्ट गोल केला होता. पण रेफ्रींनी त्याला ऑफ साईड दिल्याने तो गोल नाकारण्यात आला. याचा फटका इटलीला बसला. निर्धारित वेळेमध्ये 1-1 अशी बरोबरी झाल्यानंतर 117 व्या मिनिटाला ॲन वॉन याने दक्षिण कोरियासाठी गोल केला. या गोलमुळे दक्षिण कोरियाने उपांत्यपूर्व फेरीत वाटचाल केली. इटलीचे आव्हान तिथेच संपुष्टात आले.

हाताने अडवला फुटबॉल

2010 मधील वर्ल्डकप दक्षिण आफ्रिकेत खेळवण्यात आला. यात उरुग्वे - घाना यांच्यामध्ये उपांत्यपूर्व लढतीत 1-1 अशी बरोबरी झाली होती. जादा वेळेत घानाच्या डॉमिनिक एदीईया याने मारलेला हेडर लुईस सुआरेझ याने हाताने अडवला. त्यानंतर त्याला बाहेर काढण्यात आले. घानाला पेनल्टीही देण्यात आली. पण घानाच्या असामोह ग्यान याला पेनल्टीवर गोल करता आला नाही. त्यानंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये त्यांचा 4-2 असा पराभव झाला. तब्बल 40 वर्षांनंतर उरुग्वेचा संघ वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत पोहोचला. आणि उपांत्य फेरीत पोहोचणारा आफ्रिका खंडातील पहिला देश अशी ओळख मिळण्यापासून घाना दूर गेला. सुआरेझ याने स्वतःच्या कृतीबाबत आनंद व्यक्त केला. खरा हँड ऑफ गॉड माझाच आहे, असे तो म्हणाला. कारण त्याने अडवलेल्या गोलमुळे उरुग्वेचा संघ उपांत्य फेरीत पोहोचला होता.

Luis Suarez's Hand of God

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT