FIFA WC 2022 Trophy: 18 कॅरेट सोन्यापासून बनते फिफा वर्ल्डकपची ट्रॉफी; इटलीच्या एकाच कुटुंबाकडे ट्रॉफी बनविण्याचा अधिकार

ट्रॉफीची किंमत ऐकून व्हाल थक्क; उंची 37 सेंटीमीटर तर वजन 6 किलो
FIFA WC 2022 Trophy:
FIFA WC 2022 Trophy: Dainik Gomantak

FIFA WC 2022 Trophy: फिफा विश्वचषक स्पर्धेची धुम सुरू झाली आहे. स्पर्धेला 20 नोव्हेंबरपासून सुरवात होणार आहे. विविध संघ कतारमध्ये दाखल झाले आहेत. फुटबॉल वर्ल्डकपच्या ज्या ट्रॉफीसाठी जगभरातले 32 संघ अपार मेहनत करून एकमेकांविरोधात खेळणार आहेत, त्या ट्रॉफिविषयी काही इंटरेस्टिंग फॅक्ट जाणून घेऊया.

FIFA WC 2022 Trophy:
FIFA World Cup 2022 Tickets : एवढ्या लाखात मिळतंय 1 तिकीट; जाणून घ्या लाईव्ह स्ट्रीमिंग कसे पाहायचे

ट्रॉफीची किंमत 163 कोटींवर

फुटबॉल वर्ल्डकपमध्ये विजेत्या संघाला दिली जाणारी ट्रॉफी ही अत्यंत मौल्यवान आहे. कारण यात चक्क 18 कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. त्यामुळे या ट्रॉफीची किंमत ही जवळपास 20 मिलियन डॉलर म्हणजेच 163 कोटी रूपयांपर्यंत जाते. ट्रॉफीमध्ये सोन्याच्या प्लेटसह चांदी आणि लापिस नावाच्या मौल्यवान खडकाचा वापर केला जातो.

अशी आहे ट्रॉफी

स्पर्धेचा किक ऑफ 20 नोव्हेंबर रोजी होणार आहे. या वर्षी स्पर्धेत खेळत असलेल्या 32 देशांमध्ये ही ट्रॉफी नेण्यात आली होती त्यानंतर या ट्रॉफीचे अनावरण करण्यात आले आहे. या ट्रॉफीची उंची 14 इंच (37 सेंटीमीटर) इतकी आहे. तर वजन 6 किलोग्रॅम आहे. या ट्रॉफीवर दोन व्यक्तींनी पृथ्वी उचलून धरल्याचा आकार आहे.

FIFA WC 2022 Trophy:
FIFA World Cup: 'गोल्डन बूट' पुरस्कार कोणी अन् कधी जिंकला; पाहा आत्तापर्यंतची संपूर्ण यादी

इटलीतील कुटूंबाला ट्रॉफी बनविण्याचे अधिकार

ब्राझिलने तीन वेळा वर्ल्डकप जिंकल्यानंतर तेव्हाची ट्रॉफी कायमस्वरूपी ब्राझिल संघाकडे सोपविण्यात आली होती. त्यानंतर इटलीच्या मिलान येथील सिल्वियो गॅझानिगा या शिल्पकाराने 1971 मध्ये ही नवी ट्रॉफी साकारली. गॅझानिगा हे कारागिर आहेत. हेच कारागिर कुटूंब आजही ही ट्रॉफी बनवते. किंबहुना केवळ याच कुटूंबाकडे ही ट्रॉफी बनविण्याचा अधिकार आहे.

फिफाचे तिसरे अध्यक्ष ज्यूल्स रिमेट यांनी फिफा वर्ल्डकपची सुरवात केली होती. त्यामुळे त्यांच्या स्मरणार्थ या ट्रॉफीला त्यांचेच नाव देण्यात आले. ही ट्रॉफी ज्यूल्स रिमेट ट्रॉफी या नावाने ओळखली जाते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com