Northeast United ISL

 

Dainik gomantak

क्रीडा

नॉर्थईस्ट युनायटेड पुन्हा विजयपथावर, बंगाल सात लढतीनंतरही पराभूत

मागील दोन सामन्यांत पराभूत झालेल्या नॉर्थईस्ट युनायटेडचा हा सात लढतीतील दुसरा विजय ठरला

दैनिक गोमन्तक

पणजी : उत्तरार्धात सात मिनिटांत दोन गोल नोंदवून नॉर्थईस्ट युनायटेड संघ इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या आठव्या मोसमात पुन्हा विजयपथावर आला, तर ईस्ट बंगालला सात लढतीनंतरही विजयाविना राहावे लागले. फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर शुक्रवारी झालेल्या लढतीत गुवाहाटीच्या संघाने 2-0 फरकाने सफाईदार विजय प्राप्त केला.

सुहेर वेदाक्केपीदिका याने 61व्या मिनिटास गोलशून्य बरोबरीची कोंडी फोडल्यानंतर 68व्या मिनिटास शानदार हेडिंग साधत ऑस्ट्रेलियन (Australia) बचावपटू पॅट्रिक फ्लोटमन याने खलिद जमील यांच्या मार्गदर्शनाखालील संघाची आघाडी वाढविली. मागील दोन सामन्यांत पराभूत झालेल्या नॉर्थईस्ट युनायटेडचा हा सात लढतीतील दुसरा विजय ठरला. त्यांचे आता सात गुण झाले असून सातव्या क्रमांकावर झेप घेतली. ईस्ट बंगालचा हा सात लढतीतील चौथा पराभव ठरला. त्यामुळे तीन गुणांसह त्यांचे शेवटचे अकरावे स्थान कायम राहिले. सामन्याच्या भरपाई वेळेत ईस्ट बंगालच्या अंतोनियो पेरोसेविच याला रेड कार्ड मिळाले.

सामन्यातील तासाभरातील खेळानंतर चेंडूवर नियंत्रण गमावण्याची चूक ईस्ट बंगालच्या राजू गायकवाड याने केली. त्याला लाभ सुहेर याने उठविला, त्याने ईस्ट बंगालच्या दोघा बचावपटूंना, तसेच गोलरक्षक अरिंदम भट्टाचार्या यांना चकवा देत मोसमातील वैयक्तिक दुसरा गोल केला. नंतर नॉर्थईस्टला फ्रीकिक फटका मिळाला. मथायस कुरियर याच्या फटक्यावर इम्रान खान याने चेंडू नियंत्रित करत क्रॉसपास केला. यावेळी नेटसमोर फ्लोटमन याने अचूक हेडिंग साधत संघाची आघाडी भक्कम केली. त्याचा हा पहिलाच आयएसएल (ISL) गोल ठरला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: ‘इफ्फी’ म्हणजे चरण्याचे कुरण! देशी महोत्सवात पतन झाल्याचे काँग्रेसचे घणाघाती आरोप

Professional League 2024: जीनो क्लबचा पाचवा विजय! कुठ्ठाळी व्हिलेजर्सला नमवून पटकावले अग्रस्थान

Rashi Bhavishya 08 November 2024: तुमच्या परदेश वारीचं स्वप्न पूर्ण होणार; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

Ranji Trophy 2024: गोव्याच्या फलंदाजांची आतिषबाजी! 'स्नेहल'चे दुसरे द्विशतक; मिझोराम संकटात

Yuri Alemao: 'नोकरी घोटाळ्यातील सूत्रधार समोर यावा'! 'Cash For Job' वरुन आलेमाव यांची मागणी

SCROLL FOR NEXT