सिंधू वर्ल्ड चॅम्पियनशिपमधून बाहेर, उपांत्यपूर्व फेरीत ताई त्झू यिंगविरुद्ध पराभूत

पीव्ही सिंधूने 2019 च्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये ताई त्झूचा पराभव केला होता.
PV sindhu

PV sindhu

BWF वर्ल्ड चॅम्पियनशिप 2021 मध्ये भारताला मोठा धक्का बसला आहे. स्टार शटलर पीव्ही सिंधू उपांत्यपूर्व फेरीतील सामना गमावल्यानंतर स्पर्धेबाहेर झाली आहे, पीव्ही सिंधूचा जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकाची बॅडमिंटनपटू ताई त्झू यिंगने पराभव केला. 42 मिनिटे चाललेल्या या सामन्यात पीव्ही सिंधूचा 17-21, 13-21 असा पराभव झाला.

<div class="paragraphs"><p>PV sindhu</p></div>
Asian Hockey Championship: भारताने पाकिस्तानला दिली मात

पीव्ही सिंधूचा चायनीज तैपेईच्या ताई त्झू यिंगविरुद्धचा हा सलग पाचवा पराभव आहे. या दोघीमध्ये आतापर्यंत 20 सामने झाले असून त्यापैकी पीव्ही सिंधूला (PV Sindhu) पराभवाला सामोरे जावे लागले आहे. टोकियो ऑलिम्पिक (Tokyo Olympics) -2020 मध्ये, पीव्ही सिंधूला ताई त्झू यिंगने उपांत्य फेरीत पराभूत केले. पीव्ही सिंधूने गेल्या वेळी ही स्पर्धा जिंकली होती. अशा स्थितीत जागतिक एकेरी गटातील सहावे पदक जिंकण्यापासून ती मुकली. या सामन्यात पीव्ही सिंधू मागे पडताना दिसली. पीव्ही सिंधूला सामन्यात अनेक वेळा कोर्ट कव्हर करण्यात, ड्रॉप शॉट्समध्ये अडचणी आल्या. पीव्ही सिंधू ही जगातील सातव्या क्रमांकाची खेळाडू असून तिने दोनदा ऑलिम्पिक (Olympics) पदक जिंकले आहे. पीव्ही सिंधूने 2019 च्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये ताई त्झूचा पराभव केला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com