Love Birds
Love Birds Dainik Gomantak
क्रीडा

FIFA World Cup 2022: रोमान्स करत असाल सावधान!, होऊ शकते 7 वर्षांची शिक्षा

दैनिक गोमन्तक

Qatar Will Put Hard Restriction During FIFA World Cup 2022: फिफा विश्वचषक 2022 या वर्षी नोव्हेंबरमध्ये कतारमध्ये होणार आहे. यासाठी जगभरातून मोठ्या संख्येने चाहते कतारमध्ये येणार आहेत. दुसरीकडे, कतार सरकारने आधीच तयारी सुरु केली आहे. यामध्ये कतार सरकारने नुकताच असा निर्णय घेतला आहे, ज्याची खूप चर्चा होत आहे.

खरं तर, कतार (Qatar) सरकारने वर्ल्ड कप दरम्यान वन-नाइट स्टँड आणि सार्वजनिक रोमान्सवर बंदी घातली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कतार सरकारकडून सांगण्यात आले आहे की, परदेशी पाहुण्यांनाही कायद्याचे पालन करावे लागेल. पती-पत्नी नसलेल्या जोडप्यांना कार्यक्रमादरम्यान शारीरिक संबंध ठेवल्याबद्दल 7 वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. कतारी सरकारने आणखी अनेक कडक नियम लागू केले आहेत.

कायदा मोडल्याबद्दल 7 वर्षांची शिक्षा

कतारमध्ये इस्लामिक शरिया कायदा चालतो. यानुसार, अविवाहित लोकांना लैंगिक संबंध ठेवण्यास मनाई आहे. असे करणे हा मोठा गुन्हा मानला जातो. एवढंच नाही तर या देशात समलैंगिकतेवरही बंदी असून त्यासाठी कठोर शिक्षेची तरतूद आहे. अशा गुन्ह्यांसाठी परदेशी नागरिकांनाही (Citizen) 7 वर्षांची शिक्षा होऊ शकते, असे कतार पोलिसांनी (Police) स्पष्ट केले आहे. इथे पती-पत्नीशिवाय लैंगिक संबंध ठेवता येत नाहीत.

हॉटेलमधील खोल्यांसाठी कठोर नियम

फुटबॉल सामन्यानंतर इथे पार्टी किंवा मद्यपान करण्यास परवानगी नाही. दोन महिला आणि पुरुषांची आडनावे सारखी नसतील तर त्यांना हॉटेलमध्ये एकत्र खोली मिळणार नाही, असे सरकारने स्पष्ट केले आहे. समान खोली मिळवण्यासाठी त्यांना ते पती-पत्नी असल्याचे सिद्ध करावे लागेल. फिफा विश्वचषक स्पर्धेचे मुख्य अधिकारी नासेर म्हणाले, "कतारमध्ये मुक्त प्रेमाची संस्कृती नाही, त्यामुळे आम्ही इथे परदेशी पाहुण्यांना परवानगी देऊ शकत नाही."

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa News: गोव्यात लैंगिक अत्याचाराचे आरोप असलेले मंत्री, पोलिसांवर राजकीय दबाव; इंडिया आघाडीचा आरोप

Ponda Murder Case: सांताक्रुज, फोंड्यात मामाकडून भाच्याचा खून

Canada PM Justine Trudeau: जस्टिन ट्रुडो यांच्यासमोर 'खलिस्तानी घोषणा'; भारताने कॅनडाच्या राजदूताला बोलावून नोंदवला निषेध

दोन महिन्यात कसे वाढवले 40 हजार फॉलोअर्स, गोव्याच्या इन्फ्लुएन्सरने शेअर केलं सिक्रेट

Sahil Khan Arrested: गोव्यासह पाच राज्यातून दिवस-रात्र प्रवास; बेटिंग घोटाळ्यात अडकलेला साहिल खान अखेर गजाआड

SCROLL FOR NEXT