येत्या ऑक्टोबरमध्ये भारतात होणाऱ्या 17 वर्षांखालील महिला विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत गोवा प्रमुखकेंद्र असेल. दोन्ही उपांत्य लढतीसह फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर एकूण 16 सामने खेळले जातील.
फिफा आणि स्थानिक आयोजन समितीने (एलओसी) यांनी स्पर्धेचे अधिकृत वेळापत्रक बुधवारी जाहीर केले. 11ऑक्टोबरपासून सामने खेळले जातील. यजमान भारताचे सर्व सामने ओडिशातील भुवनेश्वर येथे होतील. गोव्यात दोन्ही उपांत्य लढती, तर महाराष्ट्रातील नवी मुंबई येथे 30 ऑक्टोबर रोजी तिसऱ्या क्रमांकाचा आणि अंतिम सामना खेळला जाईल.
गटसाखळीतील सर्व 24 सामने 18 ऑक्टोबरला संपतील. उपांत्यपूर्व फेरीतील सामने 21 व 22 ऑक्टोबरला खेळले जातील. या फेरीतील 21 ऑक्टोबरचे दोन्ही सामने नवी मुंबई येथे, तर 22 ऑक्टोबरचे दोन्ही सामने गोव्यात होतील. 26 ऑक्टोबर रोजी दोन्ही उपांत्य लढती गोव्यातच होतील.
16 संघ 32 सामने
स्पर्धेत एकूण 16 संघांचा सहभाग असेल. यजमान भारतासह चीन, जपान, मोरोक्को, नायजेरिया,टांझानिया, कॅनडा, मेक्सिको, अमेरिका, ब्राझील, चिली, कोलंबिया, न्यूझीलंड, फ्रान्स, जर्मनी, स्पेन हे संघ स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. भारत या स्पर्धेत प्रथमच खेळत आहे. स्पर्धेचा ड्रॉ 24 जून रोजी काढण्यात येईल.
फातोर्ड्यात एकूण 16 लढती
फातोर्डा स्टेडियम 11 ते 18 ऑक्टोबर या कालावधीत गटसाखळीतील 12 सामने होतील. याशिवाय उपांत्यपूर्व आणि उपांत्य फेरीतील प्रत्येकी दोन मिळून एकूण 16 सामने पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर खेळले जातील. गोव्यात स्पर्धेतील ब, ड, अ आणि क गटातील संघांचे सामने होतील.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.