Nitin Menon Dainik Gomantak
क्रीडा

अभिमानास्पद! Ashes मालिकेत 'हा' भारतीय निभावणार महत्वाची भूमिका, इंग्लंडमध्ये रंगणार थरार...

यावर्षी जून-जुलैमध्ये इंग्लंडमध्ये ऍशेस मालिका खेळवली जाणार आहे.

Pranali Kodre

The Ashes 2023: आयसीसीच्या एलिट पॅनेलमध्ये असलेले एकमेव भारतीय पंच नितीन मेनन यांची ऍशेस मालिकेसाठी निवड झाली आहे. ऍशेस ही ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघातील मानाची कसोटी मालिका मानली जाते. गेल्या कित्येक वर्षांचा इतिहास या मालिकेला लाभला आहे. त्यामुळे या मालिकेत पंचगिरी करण्याची संधी मिळणार असल्याने नितीन मेनन यांना आनंद झाला आहे.

यंदा ऍशेस मालिका जून-जुलैदरम्यान इंग्लंडमध्ये खेळवण्यात येणार आहे. 16 जूनपासून सुरु होणाऱ्या या पाच सामन्यांच्या कसोटी मालकेतील तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यांसाठी नितीन मेनन मैदानातील पंच म्हणून काम पाहाणार आहेत.

तिसरा कसोटी सामना 6 ते 10 जुलै दरम्यान लीड्सवर, तर चौथा कसोटी सामना 19-23 जुलै दरम्यान मँचेस्टरला खेळवला जाणार आहे. त्यांच्याबरोबर त्यावेळी श्रीलंकेचे कुमार धर्मसेना आणि त्रिनिदादचे जोएल विल्सन हे देखील असणार आहेत.

या संधीबद्दल 39 वर्षीय मेनन यांनी सांगितले आहे की 'ऍशेस मालिकेत पंच म्हणून काम करणे नक्कीच माझे स्वप्न होते. ती एकमेव मालिका आहे, जी मी टीव्हीवर पाहायचो. त्या मालिकेचे वातावरण, त्या मालिकेतील लढाई, हे असे काहीतरी आहे, ज्यात मला सहभागी होण्याची इच्छा होती. ती ऑस्ट्रेलिया किंवा इंग्लंड अशी कुठेही ही मालिका झाली, तरी मला त्याचा भाग व्हायला आवडेल.'

मेनन यांनी आत्तापर्यंत 18 कसोटी, 42 वनडे आणि 40 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांमध्ये पंच म्हणून काम पाहिले आहे. तसेच 4 कसोटी, 3 वनडे आणि 21 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांमध्ये टीव्ही पंच म्हणून काम पाहिले आहे. त्यांनी 10 महिला टी20 सामन्यांमध्येही पंच म्हणून काम केले आहे.

मेनन हे 2020 मध्ये एलिट पॅनलमध्ये आले आहेत. त्यांनी यापूर्वीच ऍशेस मालिकेत काम केले असते, पण गेल्या तीन वर्षात आयसीसीने कोविड-19मुळे स्थानिक पंचांनाच वापरण्याचा नियम केला होता. त्यामुळे त्यांना यापूर्वी ही संधी मिळाली नव्हती.

दरम्यान, आयसीसीच्या पंचांच्या पॅनलमध्ये नितीन मेनन यांच्याबरोबरच ऍड्रियन होल्डस्टोक (दक्षिण आफ्रिका), अहसान रझा (पाकिस्तान),ख्रिस गॅफनी (न्यूझीलंड), कुमार धर्मसेने (श्रीलंका), मरेएझ इरासमनस (दक्षिण आफ्रिका), मायकल गॉफ (इंग्लंड), पॉल रिफील (ऑस्ट्रेलिया), रिचर्ड इलिंगवर्थ (इंग्लंड), रिचर्ड केटलबोरोफ (इंग्लंड), रोडनी टकर (ऑस्ट्रेलिया), जोएल विल्सन (त्रिनिदाद) यांचा समावेश आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa Live Updates: इंडिया आघाडीच्या नेत्याच्या प्रचारासाठी विजय सरदेसाई महाराष्ट्रात!

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

SCROLL FOR NEXT