Rachin Ravindra - Devon Conway | New Zealand Cricket team 
क्रीडा

World Cup 2023: श्रीलंकेसाठी शेवट कडू! न्यूझीलंडची बंगळुरूत विजय मिळवत सेमीफायनलची दावेदारी मजबूत

New Zealand vs Sri Lanka: न्यूझीलंडने गुरुवारी श्रीलंकेला पराभूत करत वर्ल्डकप 2023 सेमीफायनलची दावेदारी मजबूत केली आहे.

Pranali Kodre

ICC ODI Cricket World Cup 2023, New Zealand vs Sri Lanka:

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत गुरुवारी न्यूझीलंडने अखेर चार सलग पराभवानंतर विजयाची चव चाखली. गुरुवारी बंगळुरुमधील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात सामना झाला. या सामन्यात न्यूझीलंडने 5 विकेट्सने विजय मिळवला.

हा सामना दोन्ही संघांचा वर्ल्डकप 2023 स्पर्धेतील अखेरचा साखळी सामना होता. या सामन्यात विजय मिळवून न्यूझीलंडने गुणतालिकेतील चौथ्या क्रमांकावर दावेदारी मजबूत केली आहे. त्यामुळे त्यांचा उपांत्य फेरीत पोहण्याच्या आशाही मजबूत झाल्या आहेत. न्यूझीलंडचा हा 9 सामन्यामधील 5 वा विजय होता, त्यामुळे त्यांचे 10 गुण झाले आहेत.

मात्र, श्रीलंकेसाठी स्पर्धेचा शेवट मात्र कडू झाला आहे. त्यांचे या स्पर्धेतील आव्हान यापूर्वीच संपले होते. मात्र, अखेरच्या सामन्यात विजय मिळवत शेवट गोड करण्याच्या त्यांच्या इच्छेवर पाणी फेरले गेले. त्याचबरोबर चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत पोहचण्याच्या त्यांच्या आशांनाही धक्का बसला आहे.

श्रीलंका 9 सामन्यांमध्ये २ विजयांसह सध्या 4 गुण मिळवून गुणतालिकेत ९ व्या क्रमांकावर आहे. मात्र, वर्ल्डकप 2023 स्पर्धेतील गुणतालिकेत पहिल्या 8 क्रमांकावर राहणारे संघच चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहेत. 

आशात आता श्रीलंकेला पहिल्या 8 मध्ये येण्यासाठी इंग्लंड आणि बांगलादेश यांच्या वर्ल्डकप 2023 मध्ये होणाऱ्या अखेरच्या साखळी सामन्यांच्या निकालावर अवलंबून राहावे लागणार आहे.

न्यूझीलंडचा मोठा विजय

गुरुवारी झालेल्या सामन्यात श्रीलंकेने न्यूझीलंडसमोर 172 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग न्यूझीलंडने 23.2 षटकात 5 विकेट्स गमावत सहज पूर्ण केला.

न्यूझीलंडकडून डेवॉन कॉनवे आणि रचिन रविंद्र यांनी सलामी शानदार सुरुवात करत 86 धावांची भागीदारी करत न्यूझीलंडच्या विजयाचा पाया रचला होता. याबरोबरच रचिनने यंदाच्या वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीतही अव्वल क्रमांक मिळवला.

त्याने या सामन्यात 42 धावांची खेळी केली. त्यामुळे आता त्याच्या 9 सामन्यात 565 धावा झाल्या आहेत. तसेच कॉनवेने 45 धावांची खेळी केली.

कॉनवे आणि रचिन दोघे बाद झाल्यानंतर केन विलियम्सन देखील स्वस्तात 14 धावांवर बाद झाला, तर मार्क चॅपमन धावबाद झाला. दरम्यान, डॅरिल मिचेलनेही चांगला खेळ करत 43 धावा फटकावल्या. अखेरीस ग्लेन फिलिप्स (17*) आणि टॉम लॅथमने (2*) न्यूझीलंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

श्रीलंकेकडून अँजेलो मॅथ्यूजने 2 विकेट्स घेतल्या, तसेच दुश्मंता चमीरा आणि महिश तिक्षणा यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतली.

तत्पुर्वी, न्यूझीलंडने नाणेफेक जिंकत श्रीलंकेला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. पण श्रीलंकेने नियमिंत अंतराने विकेट्स गमावल्या. दरम्यान, सलामीवीर कुशल परेराने आक्रमक खेळ केला.

मात्र, त्याला तोलामोलाची साथ कोणाकडून मिळाली नाही. त्याने 28 चेंडूत 9 चौकार आणि 2 षटकारांसह 51 धावा केल्या. त्याच्याव्यतिरिक्त महिश तिक्षणाने 38 धावांची खेळी केली. मात्र, अन्य कोणालाही 20 धावांचा टप्पा पार करता आला नाही. त्यामुळे श्रीलंकेचा संघ 46.4 षटकात 171 धावांवर सर्वबाद झाला.

न्यूझीलंडकडून ट्रेंट बोल्टने 3 विकेट्स घेतल्या. तसेच लॉकी फर्ग्युसन, मिचेल सँटेनर आणि रचिन रविंद्र यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतली, तर टीम साऊथीने 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT