World Cup 2023: सेमीफायनल अन् अंतिम सामन्याचे तिकीट मिळण्याची चाहत्यांना अखेरची संधी! BCCI ने दिली मोठी अपडेट

World Cup 2023 Tickets: बीसीसीआयने वर्ल्डकप 2023 मधील सेमीफायनल आणि अंतिम सामन्याच्या तिकिट विक्रीबाबत मोठी अपडेट दिली आहे.
World Cup 2023 Tickets
World Cup 2023 TicketsDainik Gomantak
Published on
Updated on

ICC ODI Cricket World Cup 2023, Semi-Final and Final Matches Ticket sale:

भारतात सुरु असलेली वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धा सध्या अंतिम टप्प्यात आली आहे. या स्पर्धेत आता प्रत्येक संघाचे अखेरचे साखळी सामने उरले आहेत. त्यानंतर उपांत्य फेरी आणि अंतिम सामना खेळवला जाणार आहे.

दरम्यान, बीसीसीआयने घोषणा केली आहे की उपांत्य आणि अंतिम सामन्यांची तिकीट विक्री ऑनलाईन केली जाणार आहे. ही तिकीट विक्री गुरुवारी केली जाणार आहे.

उपांत्य फेरीतील पहिला सामना १५ नोव्हेंबर रोजी मुंबईत आणि १६ नोव्हेंबर रोजी कोलकाता येथे होणार आहे. तसेच १९ नोव्हेंबर रोजी अंतिम सामना अहमदाबादला होणार आहे. त्यामुळे या तिन्ही सामन्यांसाठी गुरुवारी भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ८ वाजता तिकीट विक्रीला सुरुवात होणार आहे.

ही तिकीट विक्री cricketworldcup.com या वेबसाईटवर केली जाणार आहे. उपांत्य फेरीची आणि अंतिम सामन्याची तिकीट मिळवण्याची ही चाहत्यांची शेवटची संधी असणार आहे.

World Cup 2023 Tickets
NZ vs SL: पाऊस पुन्हा करणार न्यूझीलंडचा स्वप्नभंग? कसे असेल हवामान अन् समीकरण, वाचा

भारताचे उपांत्य सामन्याचे ठिकाण अद्याप अनिश्चित

सध्या भारताने गुणतालिकेत अव्वल स्थान पक्के करत उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले आहे. तसेच दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियानेही दुसरा आणि तिसरा क्रमांक पक्का करत उपांत्य फेरीत स्थान मिळवले आहे. त्यामुळे दुसरा उपांत्य सामना दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया संघात होणार असल्याचे निश्चित आहे.

मात्र, भारताचा उपांत्य फेरीतील सामना गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर राहणाऱ्या संघाशी होणार आहे. हा पहिला उपांत्य सामना असेल. मात्र, सध्या गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर राहण्यासाठी न्यूझीलंड, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान संघात स्पर्धा आहे.

World Cup 2023 Tickets
World Cup 2023: वर्ल्ड कपमध्ये इतिहास रचण्यापासून हिट मॅन एक पाऊल दूर, धोनी-विराटही करु शकले नाहीत 'ही' कामगिरी!

दरम्यान, नियोजित वेळापत्रकानुसार पहिला उपांत्य सामना मुंबईत आणि दुसरा कोलकातामध्ये होणार आहे. मात्र, जर उपांत्य फेरीत भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार असेल, तर मात्र, हा सामना मुंबईत न होता कोलकातामध्ये होईल, तर दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात मुंबईत सामना होईल.

त्यामुळे जोपर्यंत उपांत्य फेरीतील चौथे स्थान आता निश्चित होत नाही, तोपर्यंत उपांत्य फेरीत कोणता संघ कुठे सामना खेळणार हे निश्चित होणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com