Kane Williamson and Henry Nicholls  Dainik Gomantak
क्रीडा

NZ vs SL: विलियम्सन-निकोल्स श्रीलंकेसाठी डबल-ट्रबल! द्विशतकासह कसोटीत पहिल्यांदाच केला 'हा' कारनामा

वेलिंग्टन कसोटीत केन विलिमयम्सन आणि हेन्री निकोल्स या दोघांनीही श्रीलंकेविरुद्ध द्विशतकं ठोकत इतिहासात नाव कोरले आहे.

Pranali Kodre

Kane Williamson and Henry Nicholls hit Double Centuries: वेलिंग्टनला न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका संघात कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्याला शुक्रवारपासून (17 मार्च) सुरुवात झाली आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंड संघाने पहिल्या दोन्ही दिवशी वर्चस्व ठेवले आहे. पहिल्या डावात न्यूझीलंडच्या केन विलियम्सन आणि हेन्री निकोल्स यांनी द्विशतकेही साजरी केली.

विलियम्सनने या डावात 296 चेंडूत 215 धावांची खेळी केली आहे. या खेळीत त्याने 23 चौकार आणि 2 षटकार ठोकले. तसेच निकोल्सने 240 चेंडूत 15 चौकार आणि 4 षटकारांसह नाबाद 200 धावा केल्या. 

त्यामुळे न्यूझीलंडच्या क्रिकेट इतिहासात असे पहिल्यांदाच झाले की दोन खेळाडूंनी एकाच कसोटी डावात द्विशतके केली आहेत. यापूर्वी असे कधीही झाले नव्हते.

विक्रमी त्रिशतकी भागीदारी

न्यूझीलंडने टॉम लेथम आणि डवॉन कॉनवे यांच्या विकेट्स गमावल्यानंतर केन विलियम्सन आणि हेन्री निकोल्स यांची जोडी जमली होती. या दोघांनीही एकमेकांची चांगली साथ देताना त्रिशतकी भागीदारी रचली. त्यांनी बराच काळ श्रीलंकन गोलंदाजांना यश मिळू दिले नाही.

पण त्यांची जोडी विलियम्सन द्विशतक केल्यावर बाद झाल्याने तुटली. पण त्यावेळी विलियम्सन आणि निकोल्स यांनी तिसऱ्या विकेटसाठी तब्बल 363 धावांची भागीदारी केली होती. कसोटीत त्रिशतकी भागीदारी करण्याची विलियम्सन आणि निकोल्सची ही दुसरी वेळ होती.

त्यांनी यापूर्वी दोन वर्षांपूर्वी जानेवारी 2021 मध्ये ख्राइस्टचर्चमध्ये पाकिस्तानविरुद्ध झालेल्या कसोटीत 369 धावांची भागीदारी केली होती. त्या सामन्यात विलियम्सनने 238 धावा केल्या होत्या, तर निकोल्सने 157 धावा केल्या होत्या.

त्यामुळे कसोटीत न्यूझीलंडकडून दोन वेळा त्रिशतकी भागीदारी करणारी विलियम्सन आणि निकोल्स यांची पहिलीच जोडी ठरली आहे.

न्यूझीलंडने केला डाव घोषित

विलियम्सन 215 धावांवर बाद झाल्यानंतर निकोल्सने आक्रमक खेळ करत त्याचेही द्विशतक साजरे केले. दरम्यान, त्याचे द्विशतक होताच न्यूझीलंडने त्यांचा पहिला डावाही 123 षटकात 4 बाद 580 धावांवर घोषित केला.

त्यामुळे सामन्याच्या दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस श्रीलंकेला फलंदाजीला यावे लागले. श्रीलंकेने दुसऱ्या दिवसाखेर 17 षटकात 2 बाद 26 धावा केल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UGDP Revival: गोव्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट! मिकी पाशेको यांचा 'युगोडेपा'च्या पुनरागमनासाठी पुढाकार

Lessons from Animals: प्राण्यांकडूनही शिकता येतात जीवनाचे धडे! मुंग्यांची शिस्त, पक्ष्यांची मेहनत अन् निसर्गाची जादू

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

SCROLL FOR NEXT