नवी दिल्ली : भारत (India) विरुध्द न्यूझीलंड (New Zealand) यांच्यात 18 जूनपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (World Test Championship) अंतिम सामना खेळविण्यात येणार आहे. या दोन्ही संघाची गोलंदाजी भक्कम असून, या सामन्यात भारतापेक्षा न्यूझीलंडचा संघ जास्त समतोल वाटत दिसत आहे. याचे कारण त्यांच्या संघाने या सामन्याआधी इंग्लंडमध्ये (England) दोन सामने खेळले आहेत. असे मत भारताचा माजी खेळाडू सचिन तेंडुलकरने याने व्यक्त केले आहे. (New Zealand Team more balanced than India Team: Sachin Tendulkar)
सचिन म्हणाला, न्यूझीलंडच्या गोलंदाजीत विविधता आहे. टिम साऊदी उजव्या हाताने खेळणाऱ्या फलंदाजांना चेंडू चांगल्या प्रकारे आऊट स्विंग करु शकतो तर ट्रेंट बोल्ट इनस्विंग करत चेंडू आता आणू शकतो. काइल जैमीसनचा स्पिड आणि नील वेगनरचा शॉट पिच चेंडू देखील भारतीय फलंदाजांना अडथळा आणू शकतो. भारतीय संघाबद्दल त्याला विचारले असता, तो म्हणाला, साउथैंप्टनच्या पिचमधून जास्त मदत मिळाली नाही तर रविचंद्रन अश्विन आणि रविंद्र जडेजा प्रभावी ठरु शकतात.
भारतीय संघ तीन जलदगती आणि दोन फिरकी गोलंदाजांसह खेळण्याची शक्यता आहे. अश्विन आणि जडेजा दोघेही फलंदाजी देखील करु शकतात. शेवटी विकेटला पाहून संघव्यवस्थापक निर्णय घेतील. सामन्याच्या चौथ्या आणि पाचव्या दिवशी देखील फिरकी गोलंदाजांना फायदा न मिळाल्यास सरळ चेंडूटाकूनही विकेट मिळविता येऊ शकतात. शेन वॉर्न आणि मुरलीधरन यांनी सरळ चेंडू टाकूनच अनेक विकेट घेतल्या आहेत. चरळ चेंडूवर देखील फलंदाज गोंधळून जाऊ शकतो. अश्विन आणि जडेजाने इंग्लंडमधील थंड वातावरणाचा फायदा उठवायला पाहिजे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.