Kane Williamson Dainik Gomantak
क्रीडा

NZ vs SA: द. आफ्रिकेचा धुव्वा उडवत न्यूझीलंडने रचला इतिहास; केन विल्यमसन ठरला विजयाचा 'हिरो'

New Zealand vs South Africa: टीम साऊदीच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंड संघाने दुसऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेचा 7 विकेट्सने पराभव करुन इतिहास रचला आहे.

Manish Jadhav

New Zealand vs South Africa:

टीम साऊदीच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंड संघाने दुसऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेचा 7 विकेट्सने पराभव करुन इतिहास रचला आहे. या मालिकेत पाहुण्यांचा 2-0 असा पराभव करुन न्यूझीलंडने प्रथमच आफ्रिकन संघाविरुद्ध कसोटी मालिका जिंकली आहे. होय, न्यूझीलंडला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 92 वर्षात 18 प्रयत्नांनंतर हा विजय मिळाला. न्यूझीलंडच्या विजयाचे नायक केन विल्यमसन आणि विल्यम ओ'रुर्के ठरले. विल्यम ओ'रुर्कने दोन्ही डावात एकूण 9 विकेट्स घेतल्या तर विल्यमसनने दुसऱ्या डावात 133 धावांची नाबाद खेळी खेळली.

दरम्यान, हॅमिल्टनमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीत न्यूझीलंडसमोर विजयासाठी 267 धावांचे लक्ष्य होते. याआधी किवी संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) एकदाही 200 धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला नव्हता. पण यावेळी त्याने हा विक्रमही मोडला. 250 हून अधिक धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा हा चौथा विजय आहे. किवी संघाने यापूर्वी एकदा बांगलादेशविरुद्ध आणि दोनदा पाकिस्तानविरुद्ध ही कामगिरी केली आहे.

दुसरीकडे, या सामन्याच्या पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेने 242 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संघ 211 धावांवर गडगडला. 31 धावांची आघाडी घेतल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या डावात 235 धावा केल्या आणि त्यामुळे किवी संघाला 267 धावांचे लक्ष्य दिले होते. या सामन्यात विल्यम ओ'रुर्कने न्यूझीलंडकडून पदार्पण केले आणि त्याने कसोटी पदार्पणाच्या पहिल्या डावात 4 आणि दुसऱ्या डावात 5 बळी घेतले. अशाप्रकारे, त्याने या सामन्यात एकूण 9 विकेट्स घेतल्या आणि तो देशासाठी पदार्पणाच्या कसोटीत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला.

तसेच, 267 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना केन विल्यमसनने (Kane Williamson) आपल्या कसोटी कारकिर्दीतील 32 वे शतक झळकावले. डावाच्या बाबतीत हा टप्पा गाठणारा तो सर्वात वेगवान फलंदाज ठरला आहे. यासोबतच चौथ्या डावात सर्वाधिक 5 शतके झळकावणारा तो फलंदाज बनला आहे. यासह विल्यमसन (4) लक्ष्याचा पाठलाग करताना नाबाद शतक झळकावणारा नंबर-1 खेळाडू बनला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kundaim Fire: कुंडई वीजतारांमुळे वाढला धोका! आगीच्या घटनांमध्ये वाढ; तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

खोटी कागदपत्रं वापरून घेतला पासपोर्ट, गोव्यात करायची सलूनमध्ये काम; फिलिपिन्स महिलेसह स्थानिकाच्या आवळल्या मुसक्या

"वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून विकास करणार"! रितेश नाईकांनी दिली ग्वाही; पांचमे- खांडेपार तळ्याच्या संवर्धन कामाचे केले उद्‍घाटन

Farmagudhi to Bhoma Road: फर्मागुढी-भोम रस्ता काम होणार सुरु! मंत्री कामतांची ग्वाही; बांदोडा ‘अंडरपास’चे उद्‌घाटन

Chimbel Unity Mall: 'चिंबल' ग्रामस्थांचे मोठे यश! युनिटी मॉल बांधकाम परवान्याला दिले आव्हान; सरकारी पक्षाचा विरोध फेटाळला

SCROLL FOR NEXT