New Zealand Dainik Gomantak
क्रीडा

NZ vs SL: 20व्या षटकात ड्रामा! 10 रनांची गरज, न्यूझीलंडने गमावल्या 3 विकेट्स अन् तरीही श्रीलंका पराभूत

अखेरच्या षटकापर्यंत रोमांचक झालेल्या टी20 सामन्यात न्यूझीलंडने श्रीलंकेविरुद्ध विजय मिळवला.

Pranali Kodre

New Zealand vs Sri Lanka T20I: न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका यांच्यात टी२० मालिकेतील अखेरचा सामना शनिवारी (8 एप्रिल) पार पडला. या सामन्यात न्यूझीलंडने अखेरच्या षटकात ४ विकेट्सने विजय मिळवत तीन सामन्यांची टी20 मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. क्विन्सटाऊनला झालेला तिसरा सामना चांगलाच चुरशीचा झाला.

नाट्यमय अखेरचे षटक

या सामन्यात श्रीलंकेने न्यूझीलंडसमोर विजयासाठी 183 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंड अखेरच्या षटकात 10 धावांची गरज होती. या षटकाला सुरुवात होण्यापासून न्यूझीलंडच्या तीनच विकेट गेल्या होत्या. तसेच डॅरिल मिचेल 15 धावांवर आणि मार्क चॅपमन 10 धावांवर खेळत होते.

मात्र, 20 वे षटक चांगलेच नाट्यमय ठरले. या षटकात श्रीलंकेकडून लहिरू कुमाराने गोलंदाजी केली. या षटकात त्याच्या पहिल्याच चेंडूवर चॅपमनने खणखणीत षटकार मारला आणि न्यूझीलंडला विजयाच्या जवळ आणले. पण दुसऱ्याच चेंडूवर चॅपमन 16 धावांवर चरिथ असलंकाकडे झेल देत बाद झाला.

त्याच्यापुढचा चेंडू कुमाराने वाईड टाकला पण धाव घेण्याच्या प्रयत्न जिमी निशम शुन्यावर बाद झाला. त्यानंतर पुन्हा टाकलेल्या तिसऱ्या अधिकृत चेंडूवर मिचेल 15 धावांवर श्रीलंकेचा कर्णधार दसून शनकाकडे झेल देत बाद झाला. त्यामुळे न्यूझीलंड संघ संकटात सापडला होता.

अखेरच्या तीन चेंडूत तीन धावांची गरज होती. पण चौथा चेंडू बाईज होता, ज्यावर ऍडम मिल्ने आणि रचीन रविंद्रने पळून एक धाव काढली. पाचव्या चेंडूवर या दोघांनीही दुहेरी धावा धावल्या. त्यामुळे न्यूझीलंडने एक चेंडू राखून 4 विकेट्सने विजय मिळवला.

सिफर्टची शानदार अर्धशतकी खेळी

यापूर्वी या सामन्यात न्यूझीलंडकडून टीम सिफर्टने शानदार खेळ करताना 48 चेंडूत 10 चौकार आणि 3 षटकारांसह 88 धावांची खेळी केली होती. त्याला या खेळीसाठी सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला. तसेच कर्णधार टॉम लॅथमनेही 31 धावांची चांगली खेळी केली.

श्रीलंकेकडून कुमाराने 3 विकेट्स घेतल्या. तसेच महिश तिक्षणा आणि प्रमोद मदुशन यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

तत्पूर्वी या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून श्रीलंकेला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले होते. त्यामुळे श्रीलंकेने प्रथम फलंदाजी केली. श्रीलंकेकडून यष्टीरक्षक फलंदाज कुशल मेंडिसने 48 चेंडूत 6 चौकार आणि 4 षटकारांसह सर्वाधिक 73 धावांची खेळी केली.

तसेच कुशल परेराने धावबाद होण्यापूर्वी 33 धावांची खेळी केली, तर सलामीवीर पाथम निसंकाने 25 धावा केल्या. यांच्याशिवाय कोणालाही फार काही खास करता आले नाही. त्यामुळे श्रीलंकेने 20 षटकात 6 बाद 182 धावा केल्या. न्यूझीलंडकडून बेन लिस्टरने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तसेच ऍडम मिल्ने आणि ईश सोधीने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lessons from Animals: प्राण्यांकडूनही शिकता येतात जीवनाचे धडे! मुंग्यांची शिस्त, पक्ष्यांची मेहनत अन् निसर्गाची जादू

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT