State Level Women's Chess Tournament Dainik Gomantak
क्रीडा

Chess Tournament: राज्यस्तरीय महिला बुद्धिबळ स्पर्धेत नेत्रा सावईकर विजेती

सहा फेऱ्यांत केली सर्वाधिक गुणांची कमाई

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यस्तरीय महिला बुद्धिबळ स्पर्धेत नेत्रा सावईकर हिने विजेतेपद पटकाविले. तिने सहा फेऱ्यांतून सर्वाधिक साडेपाच गुणांची कमाई केली. श्रीपाद आणि अनुसुया कामत तारकर स्मृती राज्यस्तरीय महिला स्पर्धा तिसवाडी तालुका बुद्धिबळ संघटनेच्या सहकार्याने घेण्यात आली. स्पर्धा मळा-पणजी येथील महालक्ष्मी वाचन मंदिरात झाली.

(Netra Savaikar Winner of Goa State Level Women's Chess Tournament)

नेत्राने विजेतेपद निश्चित करताना पाच विजय व एक बरोबरी नोंदविली. तिने अस्मिता रे हिच्यावर नोंदविलेला विजय निर्णायक ठरला. अस्मिता पाच गुणांसह उपविजेती ठरली, तेवढेच गुण प्राप्त केलेल्या सयुरी नाईक हिला तिसरा क्रमांक मिळाला. स्पर्धेतील पहिल्या चौघी जणी 8 ते 18 नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या राष्ट्रीय महिला बुद्धिबळ स्पर्धेत गोव्याचे प्रतिनिधित्व करतील.

संस्कृती नारोजी, स्वेरा ब्रागांझा, राचेल परेरा, आर्या दाभोळकर, श्रीवल्ली गांधी, स्नेहल नाईक व आर्वी नाईक यांनी अनुक्रमे चौथा ते दहावा क्रमांक मिळविला. वयोगटात (7, 9, 11 व 13 वर्षांखालील) अवनी सावईकर, दिया सावळ, वैष्णवी परब, वालंका फर्नांडिस, निलिशा फाचो, गुंजल चोपडेकर, अलाना आंद्राद यांना बक्षीस मिळाले.

श्रीपाद व अनुसुया कामत तारकर यांची कन्या रमा रामाणी, महालक्ष्मी वाचन मंदिराचे सचिव नारायण पेडणेकर, गोवा बुद्धिबळ अस्थायी समितीचे निमंत्रक सचिन आरोलकर, मिलिंद रामाणी, अरविंद म्हामल, दत्ताराम पिंगे, प्रकाश सावंत, आतिश आंगले, नरेश पेडणेकर यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: पाण्याच्या बाटलीवरून 'महाभारत'! निजामुद्दीन स्टेशनवर विक्रेत्यांमध्ये तुफान हाणामारी; रेल्वेनं ठोठावला 5 लाखांचा दंड

Virat Kohli: किंग कोहलीला दिसला वर्ल्ड कप फायनलचा 'फ्लॅशबॅक'; ऑस्ट्रेलियात सरावादरम्यान चाहत्यांची धडधड वाढली, पाहा VIDEO!

Uttar Pradesh Crime: 'राजकारण करण्यासाठी येऊ नका'; राहुल गांधींच्या भेटीपूर्वीचा रायबरेली लिचिंग पीडित कुटुंबाचा VIDEO व्हायरल

Surya Gochar Horoscope: सूर्य तूळ राशीत! 'या' 3 राशींच्या करिअर आणि आर्थिक आयुष्यात मोठे बदल; राहा सावध

VIDEO: मैदानावर अपघात! थ्रोचा निशाणा चुकला अन् फलंदाजाला दुखापत; खेळाडूला स्ट्रेचरवरून नेतानाचा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT