Sachin Tendulkar In Goa: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने नुकतेच गोवा दौरा केला. गोव्यात येण्यापुर्वी अगदी कोल्हापुरातील नृसिंहवाडील मंदिरातील पहाटेच्या आरतीपासून ते बेळगाव-गोवा मार्गावर चहासाठी थांबण्यापर्यंत सचिनच्या अनेक गोष्टींची चर्चा झाली. त्यातच आता सचिनच्या गोव्यातील एका व्हिडिओतील गोष्टीची चर्चा सोशल मीडियात सुरू झाली आहे.
या व्हिडिओमध्ये सचिन समुद्र किनाऱ्यावरर दिसतो आणि पार्श्वभुमीला चक्क एक वॉटर स्कुटर एका व्यक्तीच्या अंगावर येताना दिसते. सचिनच्या व्हिडिओच्या पार्श्वभुमीला घडलेली ही घटना अनेक युजर्सच्या लक्षात आली आणि त्यावरून त्या व्यक्तीबाबत सर्वांनीच काळजी व्यक्त केली आहे.
या गोवा सफारीबाबत सचिनने अविश्वसनीय अनुभव अशी भावनाही व्यक्त केली आहे. सचिनने गोवा दौऱ्यातील अनेक फोटोज, व्हिडिओज सोशल मीडियात शेअर केले आङेत. त्यातील एका व्हिडिओत सचिन बाणावली किनाऱ्यावर स्थानिक कोळी बांधवांसोबत चर्चा करतानाही दिसतो. . गोव्यातील मच्छिमारांसोबत एक मस्त सकाळ... अशी कॅप्शन तेंडुलकरने दिली आहे. मुलगा अर्जून तेंडुलकरसोबत स्थानिक रूचकर पदार्थांची चव घेतानाचा व्हिडिओही सचिनने शेअर केला आहे.
या कोळी बांधवांनी सचिनला पारंपरिक मासेमारीबाबतची माहितीही दिली. सचिनने यावेळी गोव्यातील समुद्र किनाऱ्यावर वॉटर स्पोर्टसचा आनंद लुटला. यावेळी व्हिडिओत सचिनच्या पार्श्वभुमीला दिसते की, एक व्यक्ती चक्क जेट स्की (वॉटर स्कुटर) खाली आली आहे. हे पाहून सर्वांनाच त्या व्यक्तीची काळजी वाटू लागली. अनेक इन्स्टाग्राम युजर्सनी ही गोष्ट नजरेस आणून दिली आहे. सुदैवाने त्या व्यक्तीला काही दुखापत झाली नाही. त्यामुळे सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. ज्यांनी व्हिडिओत ही गोष्ट पाहिली ते त्या व्यक्तीला काहीही मदत करू शकत नव्हते, पण त्यांनी तेंडुलकरच्या या सोशल मीडिया पोस्टमध्ये स्वतःच्या भावना कॉमेंटमध्ये व्यक्त केल्या आहेत.
एका इन्स्टाग्राम युजरने लिहिले आहे की, जेट स्कीच्या खाली आलेल्या त्या व्यक्तीकडे सर्वजण दुर्लक्ष करणार का? आणखी एकाने म्हटले आहे की, पीछे डुब गया एक सर..., केवळ दिग्गजांनाच कळेल या व्हिडिओत काय झाले आहे ते, काय अनुभव काय अनुभव आहे हा... मागे एका व्यक्तीला धडक देऊन त्याला मारून टाकले.
ट्विटर युजर्सनीदेखील या व्हिडिओची नेमकी ती घटना दाखवणारी क्लिप शेअर केली आहे. इन्स्टाग्रामवर याबाबतचे मीम्सही तयार झाले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.