KL Rahul Shreyas Iyer BCCI
क्रीडा

World Cup 2023: श्रेयस-केएल राहुलचा शतकी दणका, तर चौघांची फिफ्टी! भारताचे नेदरलँड्सला 411 धावांचे लक्ष्य

India vs Netherlands: वर्ल्डकप 2023 च्या शेवटच्या साखळी सामन्यात भारताने नेदरलँड्सला 411 धावांचे आव्हान दिले आहे.

Pranali Kodre

ICC ODI Cricket World Cup 2023, India vs Netherlands:

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत भारत आणि नेदरलँड्स संघात रविवारी (12 नोव्हेंबर) अखेरचा साखळी सामना खेळवला जात आहे. बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात भारताने नेदरलँड्ससमोर 411 धावांचे आव्हान दिले आहे.

या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे भारताकडून कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल सलामीला फलंदाजीला उतरले. या दोघांनीही आक्रमक खेळ केला. त्यामुळे भारताने जवळपास 10 च्या धावगतीने सुरुवातीला धावा केल्या होत्या. त्यांनी 100 धावांची भागीदारी केली.

पण गिलला 12 व्या षटकात पॉल वॅन मीकरनने 51 धावांवर बाद केले, तर रोहितला 18 व्या षटकात बास डी लीडने 61 धावांवर बाद केले. त्यानंतर विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांच्यातही चांगली भागीदारी झाली. त्यांनी तिसऱ्या विकेटसाठी 71 धावांची भागीदारी केली.

यादरम्यान विराटनेही अर्धशतक केले. पण विराटही अर्धशतकानंतर लगेचच 51 धावांवर बाद झाला. त्याला रोलॉफ वॅन डर मर्वेने बाद केले.

यानंतर मात्र, श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांनी नेदरलँड्सच्या गोलंदाजांना मोठे यश मिळू दिले नाही. या दोघांनीही शतकी खेळी केली. पण केएल राहुल अखेरच्या षटकात बाद झाला. त्याने चेंडूत षटकार आणि चौकारांसह धावांची खेळी केली.

श्रेयसने 94 चेंडूत 5 षटकार आणि 10 चौकारांसह 128 धावांची नाबाद खेळी केली. तर केएल राहुलने 64 चेंडूत 4 षटकार आणि 11 चौकारांसह 102 धावांची खेळी केली. त्यामुळे भारताने 50 षटकात 4 बाद 410 धावा केल्या.

दरम्यान, या सामन्यात एक विश्वविक्रम नोंदवला गेला. वर्ल्डकपमध्ये एकाच सामन्यात पहिल्या 5 फलंदाजांनी 50 धावांचा टप्पा पार करण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa to Nepal on Electric Bike: गोव्याच्या पोरांची कमाल! 'इलेक्ट्रिक बाईक'वरून गाठलं थेट 'नेपाळ'; 3,300 किमीचा थरार

UGC New Rules: "जातीवरुन कोणाशीही भेदभाव होणार नाही!", युजीसीच्या नवीन 'समानता' नियमावलीवर शिक्षण मंत्र्यांनी स्पष्टचं सांगितलं VIDEO

Goa Drug Case: 'वार्का'त फ्लॅटवर छापेमारी! 2 लाखांच्या ड्रग्जसह दोघे ताब्यात; गोवा पोलिसांकडून रॅकेटचा पर्दाफाश

Amazon Layoffs: अ‍ॅमेझॉन 16000 कर्मचाऱ्यांना देणार नारळ! पुन्हा एकदा 'ले-ऑफ'चा धडाका; बंगळुरु, हैदराबाद अन् चेन्नईतील ऑफिसेस 'हिटलिस्ट'वर

Cricketer Retirement: T20 विश्वचषकापूर्वी मोठा धक्का; स्टार खेळाडूनं अचानक केली निवृत्तीची घोषणा, पोस्ट करत म्हणाला...

SCROLL FOR NEXT