Team India: शुभ दीपावली! टीम इंडियाने पारंपारिक वेशात एकत्र साजरी केली दिवाळी, पाहा Video

Team India Celebrate Diwali: भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंनी एकत्र येत दिवाळी साजरी केली.
Team India | Diwali
Team India | DiwaliBCCI
Published on
Updated on

Team India Celebrate Diwali ahead Of match against Netherlands in ICC ODI Cricket World Cup 2023:

भारतभरात सध्या दिवाळी सण उत्साहात साजरा केला जात आहे. त्यातच भारतात १३ वा वनडे वर्ल्डकपही खेळवला जात आहे. विशेष म्हणजे लक्ष्मीपुजनाच्या दिवशी म्हणजेच रविवारी भारताचा वर्ल्डकप २०२३ मधील अखेरचा साखळी सामना देखील आहे. भारताचा हा सामना नेदरलँड्सविरुद्ध बंगळुरूमध्ये एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे.

त्यापूर्वी, भारतीय संघाने जोरदार दिवाळी साजरी केली आहे. भारतीय संघ सध्या बंगळुरूमध्ये असल्याने तिथे सर्वांनी मिळून एकत्र दिवाळ सण साजरा केला. याचा व्हिडिओही बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये भारतीय संघातील खेळाडू पारंपारिक वेषात त्यांच्या कुटुंबियांसमवेत एका मोठ्या हॉलमध्ये जमलेले दिसत आहेत. तसेच भारतीय संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविड आणि इतर सपोर्ट स्टाफ सदस्यही यावेळी हॉलमध्ये उपस्थित होते. यावेळी त्यांनी एकमेकांची गळाभेट घेत दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्या. या व्हिडिओवर चाहत्यांकडून अनेक प्रतिक्रियाही आल्या आहेत.

भारतीय संघ दमदार फॉर्ममध्ये

भारतीय क्रिकेट संघ सघ्या दमदार फॉर्ममध्ये आहे. भारताने वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील ८ पैकी ८ सामने जिंकले आहेत. भारताने आत्तापर्यंत ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश, न्यूझीलंड, इंग्लंड, श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका या संघांना साखळी फेरीत पराभूत केले आहे.

त्यामुळे भारतीय संघाने उपांत्य फेरीतील स्थानही पक्के केले आहे. भारतीय संघाचा उपांत्य सामना न्यूझीलंडविरुद्ध बुधवारी (१५ नोव्हेंबर) खेळवला जाणार आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होईल.

  • भारतीय संघ -  रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, आर अश्विन, इशान किशन, सूर्यकुमार यादव.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com