Netherlands Cricket Team ANI
क्रीडा

IND vs NED: भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी नेदरलँड्स संघात मोठा बदल! 23 वर्षीय खेळाडूला दिली संधी

Netherlands World Cup Team: भारताविरुद्ध वर्ल्डकप 2023 स्पर्धेत होणाऱ्या सामन्यापूर्वी नेदरलँड्सने संघात मोठा बदल केला आहे.

Pranali Kodre

Netherlands made a change in squad ahead of match against India at ICC Men's ODI Cricket World Cup 2023:

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेतील शेवटचा साखळी सामना रविवारी (12 नोव्हेंबर) रंगणार आहे. हा सामना भारत विरुद्ध नेदरलँड्स संघात बंगळुरुमधील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगणार आहे. दरम्यान, या सामन्यापूर्वी नेदरलँड्सने आपल्या संघात एक मोठा बदल केला आहे.

या सामन्यापूर्वी त्यांचा वेगवान गोलंदाज रायन क्लेन संघातून बाहेर झाला आहे. त्याला पाठीच्या दुखापतीमुळे भारताविरुद्धचा सामना खेळता येणार नाही. त्यामुळे त्याच्या जागेवर नेदरलँड्सने 23 वर्षीय नोह कोएजचा बदली खेळाडू म्हणून 15 जणांच्या संघात समावेश केला आहे.

नेदरलँड्सच्या या 15 जणांच्या संघातील बदलाला वर्ल्डकप 2023 स्पर्धेच्या तांत्रिक समितीने परवानगी दिली आहे.

नोहने आत्तापर्यंत नेदरलँड्ससाठी एकच सामना खेळला आहे. जुलैमध्ये त्याने वर्ल्डकप 2023 च्या पात्रता स्पर्धेतील अंतिम सामन्यातून नेदरलँड्सकडून पदार्पण केले होते. पण त्याला त्या सामन्यात 7 धावाच करता आल्या होत्या.

तसेच क्लेन यानेही सध्या सुरु असलेल्या वर्ल्डकप स्पर्धेत एकच सामना खेळला आहे. त्याने न्यूझीलंडविरुद्ध हैदराबादमध्ये सामना खेळला होता, पण त्याला 7 षटकात एकही विकेट घेता आली नव्हती.

नेदरलँड्ससाठी महत्त्वाचा सामना

दरम्यान, नेदरलँड्सचे वर्ल्डकप 2023 स्पर्धेतील आव्हान संपले असले, तरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पोहचण्याच्या दृष्टीनेही हा सामना नेदरलँड्ससाठी महत्त्वाचा असेल. सध्या नेदरलँड्स 8 सामन्यांपैकी पैकी 2 सामने जिंकून 4 गुणांसह 10 व्या क्रमांकावर आहे.

मात्र, वर्ल्डकप 2023 स्पर्धेतील गुणतालिकेत पहिल्या 8 क्रमांकावर राहणारे संघच चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहेत. अशात आणखी एक सामना जिंकून पहिल्या 8 संघात येण्याचा नेदरलँड्स प्रयत्न करेल.

नेदरलँड्सने या वर्ल्डकपमध्ये बलाढ्य दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा मोठा धक्का दिला आहे. तसेच त्यांनी बांगलादेशलाही पराभूत केले आहे.

नेदरलँड्सचा संघ -

स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार), मॅक्स ओ'डॉड, बास डी लीड, विक्रम सिंग, तेजा निदामनुरु, पॉल व्हॅन मीकेरेन, कॉलिन अकरमन, रोलॉफ वॅन डर मर्वे, लोगन वॅन बीक, आर्यन दत्त, नोह क्रोएज, वेस्ली बॅरेसी, साकिब झुल्फिकार, शरीझ अहमद, सायब्रँड एंजलब्रेच

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

KL Rahul Century: लॉर्ड्सच्या मैदानावर राहुलची बादशाही, आशियात कुणालाच जमलं नाही ते करुन दाखवलं

Goa Tourism: पावसाळ्यातही गोव्यातील पर्यटन फुल्ल; बीचवर पर्यटकांची गर्दी

ट्रॉलर्स मालकांचे आंदोलन! बंदी असताना नियमांचे उल्लंघन; पारंपरिक मच्छीमारांवर बेकायदेशीर मासेमारीचा आरोप

प्रेमात धोका दिलेल्या व्यक्तीला पुन्हा जवळ करावं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं रंजक उत्तर; म्हणले...

Joe Root Record: क्रिकेटच्या देवाचा कसोटीतील महान विक्रम धोक्यात, जो रूट करणार राडा? आहे इतिहास रचण्याची संधी...

SCROLL FOR NEXT