India vs Pakistan Dainik Gomantak
क्रीडा

The Greatest Rivalry: भारत-पाकिस्तान क्रिकेटचा थरार आता डॉक्युमेंट्रीमध्ये, नेटफ्लिक्सने रिलीज केला टीझर

India vs Pakistan Cricket Documentary: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील प्रतिस्पर्धा दाखवणाऱ्या डॉक्युमेंट्रीचा टीझर नेटफ्लिक्सने रिलीज केला आहे.

Pranali Kodre

Netflix release teaser of 'The Greatest Rivalry', documentary based on India vs Pakistan Cricket

मैदान कोणतंही असो, भारत आणि पाकिस्तान आमने-सामने आले की कट्टर प्रतिस्पर्धा पाहायलाच मिळते. त्यातही क्रिकेटच्या मैदानात जेव्हाही हे दोन संघ एकमेकांसमोर उभे राहातात, तेव्हा अनेक रोमांचक घटना घडताना दिसतात. या सामन्याचे क्रिकेट चाहत्यांसाठी एक वेगळेच महत्त्व आहे.

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील क्रिकेट चाहत्यांच्या भावनाही या सामन्याशी जोडलेल्या आहेत. आता हीच प्रतिस्पर्धा एका डॉक्युमेंट्रीमध्येही पाहता येणार आहे. या दोन संघातील क्रिकेट सामन्यांमधील प्रतिस्पर्धेच्या आठवणींना उजाळा देणारी एक डॉक्युमेंट्री नेटफ्लिक्सवर प्रदर्शित केली जाणार आहे.

या डॉक्युमेंट्रीचे नाव 'द ग्रेटेस्ट रायवलरी' असे आहे. या डॉक्युमेंट्रीचा टीझरही नेटफ्लिक्सने रिलीज केला आहे. दरम्यान, सध्या केवळ टीझर रिलीज करण्यात आला असून ही सिरिज प्रेक्षकांच्या भेटीला कधी येणार, याची तारीख मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.

मात्र, या डॉक्युमेंट्रीमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील प्रतिद्वंदतेच्या इतिहासावर प्रकाश टाकण्यात आल्याचे समजत आहे. टीझरमध्ये कपिल देव आणि इम्रान खान यांना वर्ल्डकप ट्रॉफीसह दाखवण्यात आले आहे. याशिवाय विरेंद्र सेहवाग, सचिन तेंडुलकर, शोएब अख्तर हे देखील टीझरमध्ये दिसत आहेत.

भारत विरुद्ध पाकिस्तान

भारत आणि पाकिस्तान गेल्या जळपास 7 दशकांपासून एकमेकांविरुद्ध क्रिकेट खेळत आहेत. दरम्यान, गेल्या 12 वर्षात या दोन संघात दोन्ही देशांमधील राजकिय तणावामुळे द्विपक्षीय मालिका झालेल्या नाहीत.

त्यामुळे गेल्या 12 वर्षात हे दोन संघ केवळ आयसीसीच्या आणि आशियाई क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये आमने-सामने आले आहेत. दरम्यान, आत्तापर्यंत वनडे वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाने नेहमीच पाकिस्तानवर वर्चस्व ठेवले आहे.

आत्तापर्यंत या दोन संघांमध्ये 59 कसोटी सामने खेळवण्यात आले आहेत. यातील 9 सामने भारताने जिंकले आहेत, तर 12 सामने पाकिस्तानने जिंकले आहेत. तसेच 38 सामने अनिर्णित राहिले आहेत. भारत आणि पाकिस्तान संघात अखेरचा कसोटी सामना 2007 मध्ये खेळवण्यात आला होता.

भारत आणि पाकिस्तान संघात आत्तापर्यंत 135 सामने खेळवण्यात आले आहेत. यातील 57 सामने भारताने जिंकले आहेत, तर 73 सामने पाकिस्तानने जिंकले आहेत. त्याचबरोबर 5 सामन्यांचा निकाल लागलेला नाही.

आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 12 वेळा हे दोन संघ आमने-सामने आले आहेत. त्यातील 8 सामने भारताने जिंकले आहेत, तर 3 सामने पाकिस्तानने जिंकले आहेत आणि 1 सामना अनिर्णित राहिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs PAK: पाकडे नाही सुधारणार! LIVE सामन्यात शिवीगाळ करत 'लज्जास्पद' कृत्य Watch Video

Morjim Beach: गोव्याच्या 'मोरजी बीच'वर बैलांची झुंज, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल Watch Video

Delhi Blast: दिल्ली स्फोट प्रकरण, 'आय 20' कारचा मालक आमिर अटकेत; दहशतवादी डॉ. उमरसोबत आखली होती स्फोटाची योजना

Viral Video: पैशांसाठी तरुणीला शिवीगाळ, MNS कार्यकर्ते आक्रमक; परप्रांतीय तरुणाला कार्यालयात बोलावून चोपलं

Gautam Gambhir Angry: "टेम्बा बावुमाची बॅटिंग पाहा..." टीम इंडियाच्या 'फ्लॉप शो'वर गंभीर भडकला; फलंदाजांच्या क्षमतेवर थेट प्रश्नचिन्ह Watch Video

SCROLL FOR NEXT