भारत-न्यूझीलंड सामना ठरला ब्लॉकबस्टर! IND vs PAK लाही मागे टाकत रचला Viewership चा नवा इतिहास

India vs New Zealand Viewership: वर्ल्डकप 2023 स्पर्धेत झालेल्या भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्याने व्ह्युवरशिपबाबतही इतिहास घडवला आहे.
India vs New Zealand
India vs New ZealandICC and BCCI

ICC ODI Cricket World Cup 2023, India vs New Zealand, New Record for Digital Viewership:

रविवारी (22 ऑक्टोबर) भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेचा सामना पार पडला. धरमशाला येथे झालेल्या या सामन्यात भारताने 4 विकेट्सने विजय मिळवला. हा भारताचा या स्पर्धेतील सलग पाचवा विजय ठरला. दरम्यान, या सामन्याने मोठा विक्रमही मोडला आहे.

भारत आणि न्यूझीलंड संघात झालेला हा सामना डिज्नी प्लस हॉटस्टार या डिजिटल प्लॅटफॉर्मवर 4.3 कोटी युजर्सने एकाचवेळी पाहिला. डिजिटल प्लॅटफॉर्मच्या इतिहासात आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्याला मिळालेले हे सर्वाधिक युजर्स आहेत.

हा सामना अंतिम क्षणी अत्यंत रोमांचक वळणावर होता. दोन्ही संघ विजयासाठी प्रयत्न करत होते. दरम्यान, विराट कोहलीला पुन्हा एकदा शतकाची संधी होती. तसेच भारताने तब्बल २० वर्षांनी न्यूझीलंडला वनडे वर्ल्डकपमध्ये पराभूत केले. अशात प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात हॉटस्टारवर सामना पाहण्याचा इतिहास घडला.

India vs New Zealand
World Cup 2023: भारताचा सलग पाचवा विजय! विराटचं शतक हुकलं पण, 20 वर्षांनंतर न्यूझीलंडला पाजलं पराभवाचं पाणी

या सामन्याने आयपीएल 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या आणि भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याच्या विक्रमाला मागे टाकले आहे. यावर्षी मे महिन्याच्या अखेरीस चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स संघात झालेला आयपीएलचा अंतिम सामन्याला जिओ सिनेमावर 3.2 कोटी लोकांनी पाहिले होते.

तसेच भारत आणि पाकिस्तान संघात 14 ऑक्टोबर रोजी वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेतच झालेला हा सामना डिज्नी प्लस हॉटस्टार या डिजिटल प्लॅटफॉर्मवर 3.5 कोटी युजर्सने एकाचवेळी पाहिला होता. मात्र, आता हे सर्व विक्रम भारत आणि न्यूझीलंड सामन्याने मोडले आहेत.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की हॉटस्टारवर यंदा वर्ल्डकपचे सामने मोबाईलवर मोफत पाहाता येत आहेत. त्यामुळे चाहत्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.

India vs New Zealand
IND vs PAK: 'बेस्ट फिल्डर ठरलाय...' अन् अचानक भारतीय खेळाडू करू लागले KL राहुलला चिअर

दरम्यान, रविवारी झालेल्या सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात सर्वबाद 273 धावा केल्या होत्या. न्यूझीलंडकडून डॅरिल मिचेलने सर्वाधिक 130 धावांची खेळी केली. त्याने 127 चेंडूत ही खेळी करताना 9 चौकार आणि 5 षटकार मारले. तसेच रचिन रविंद्रने 87 चेंडूत 75 धावांची खेळी केली.

तसेच भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तसेच कुलदीप यादवने 2 विकेट्स घेतल्या, तर जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

त्यानंतर भारताने 274 धावांचे आव्हान 6 विकेट्स गमावत 48 षटकात पूर्ण केले. भारताकडून विराट कोहलीने सर्वाधिक 95 धावांची खेळी केली. तसेच रविंद्र जडेजा 39 धावांवर नाबाद राहिला. याशिवाय रोहित शर्माने 46, शुभमन गिल 26, श्रेयस अय्यर 33 आणि केएल राहुलने 27 धावांची छोटेखानी महत्त्वपूर्ण खेळी केल्या.

न्यूझीलंडकडून गोलंदाजी करताना लॉकी फर्ग्युसनने 2 विकेट्स घेतल्या. तसेच मॅट हेन्री, मिचेल सँटेनर आणि ट्रेंट बोल्ट यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com