Nepal Cricket Team X/ICC
क्रीडा

Nepal Tour of India: BCCI पाळणार शेजारधर्म! नेपाळसाठी आयोजित करणार तिरंगी T20 मालिका

Nepal Tour of India Schedule: नेपाळ संघ भारत दौरा करणार असून 31 मार्चपासून तिरंगी मालिका खेळवणार आहे. ही मालिका बीसीसीआय आयोजित करणार आहे.

Pranali Kodre

Nepal men's cricket team to tour India for a T20 tri-series Schedule:

यावर्षी जूनमध्ये टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. या मोठ्या स्पर्धेपूर्वी नेपाळ संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात नेपाळला तिरंगी टी20 मालिका खेळायची आहे. ही मालिका भारतीय क्रिकेट नियमाक मंडळाकडून (BCCI) आयोजित करण्यात येणार आहे.

या तिरंगी मालिकेचा हेतू नेपाळला टी20 वर्ल्डकपची तयारी करण्यासाठी आहे. या तिरंगी मालिकेचे नाव फ्रेंडशीप कप ठेवण्यात आले आहे.

नेपाळ संघ ही तिरंगी मालिका बडोदा क्रिकेट असोसिएशन आणि गुजराज क्रिकेट असोसिएशन बरोबर खेळणार आहे. याबद्दल नुकतीच नेपाळ क्रिकेट असोसिएशनने माहिती दिली आहे. ही तिरंगी मालिका 31 मार्चपासून चालू होणार आहे.

पहिला सामना नेपाळ विरुद्ध गुजरात संघात रंगणार आहे. तसेच अंतिम सामना 7 एप्रिलला खेळवला जाणार आहे.

ही फ्रेंडशिप कप मालिका एकदाच होणार नाही, तर त्याचा समावेश वार्षिक वेळापत्रकातही करण्यात येण्यासाठी प्रस्ताव मांडण्यात आला आहे. यामुळे भारत आणि नेपाळ यांच्यातील मैत्रीला आणि खिलाडूवृत्तीला प्रोत्साहन मिळेल.

दरम्यान, ही मालिका नेपाळसाठी महत्त्वाची ठरणार आहे. कारण नेपाळने कॅरेबियन बेटे (वेस्ट इंडिज) आणि अमेरिकेत होणाऱ्या टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे. त्यामुळे त्याआधी ही मालिका होणार असल्याने नेपाळला तयारी करताना बीसीसीआयच्या बलाढ्य राज्य संघांविरुद्ध खेळण्याची संधी मिळणार आहे.

नेपाळची गुजरात आणि बडोदाविरुद्ध होणारी टी20 मालिका वापीमधील साई मेघपण स्पोर्ट्सलाईफ फॅसिलिटीमध्ये खेळवण्यात येणार आहे.

असे आहे तिरंगी मालिकेचे वेळापत्रक

  • 31 मार्च - नेपाळ विरुद्ध गुजरात

  • 1 एप्रिल - गुजरात विरुद्ध बडोदा

  • 2 एप्रिल - नेपाळ विरुद्ध बडोदा

  • 3 एप्रिल - नेपाळ विरुद्ध गुजरात

  • 4 एप्रिल - बडोदा विरुद्ध गुजरात

  • 5 एप्रिल - नेपाळ विरुद्ध बडोदा

  • 7 एप्रिल - अंतिम सामना

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

WI vs PAK: 18 धावांत 6 विकेट्स...! पाकिस्तानच्या फलंदाजांचा वेस्ट इंडिजच्या 'या' पठ्ठ्यानं उडवला फज्जा; डेल स्टेनचा मोडला 13 वर्ष जुना रेकॉर्ड

Rahul Gandhi: 'मृत' मतदारांसोबत राहुल गांधींची 'चाय पे चर्चा'! निवडणूक आयोगावर पुन्हा साधला निशाणा; VIDEO

Aahana Kumra: 'पोलिस अधिकाऱ्यांशी हुज्जत घातली, गोव्यात मला अटक झाली असती'; प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला अनुभव

Pune Crime: रंगकाम करताना घरमालकाला लावला चुना; पुण्यात 4 लाखांची चोरी करणाऱ्या प्रमोदला गोव्यात अटक

Horoscope: गुरुवारी 'गजलक्ष्मी योग'चा शुभ संयोग! 'या' 5 राशींच्या लोकांसाठी उद्याचा दिवस खूप खास, होणार मोठा धनलाभ; भगवान विष्णूचीही राहणार कृपा

SCROLL FOR NEXT