Neeraj Chopra  Twitter
क्रीडा

नीरज चोप्राचा Diamond League Final मध्ये दुसरा क्रमांक, 'या' देशाचा खेळाडू बनला चॅम्पियन

Neeraj Chopra: डायमंड लीग फायनल स्पर्धेचे विजेतेपद राखण्यात नीरज चोप्राला अपयश आले असून तो दुसऱ्या क्रमांकावर आला आहे.

Pranali Kodre

Neeraj Chopra second position in Eugene Diamond League final 2023 with 83.80 meter Throw:

अमेरिकेतील युजीनमध्ये रविवारी झालेल्या डायमंड लीग फायनलमध्ये नीरज चोप्राला विजेतेपद राखण्यात अपयश आले आहे. त्याने रविवारी 83.80 मीटर भालाफेक करत दुसरा क्रमांक मिळवला.

नीरज गेल्यावर्षी झालेल्या डायमंड लीग फायनल स्पर्धेत अव्वल क्रमांकावर राहिला होता. त्यावेळी तो या स्पर्धेचे विजेतेपद मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला होता. पण हे विजेतेपद यावर्षी नीरजला राखता आले नाही.

डायमंड लीग फायनल 2023 स्पर्धेत चेक गणराज्यच्या याकुब वडलेजचने पहिला क्रमांक मिळवत विजेतेपद पटकावले. याकुब वडलेजचने दुसऱ्या प्रयत्नात 84.24 मीटर भालाफेक केला होता.

विशेष म्हणजे त्याने पहिल्या प्रयत्नात देखील 84.01 मीटर भाला फेक केला होता, त्याचे हे अंतरही अन्य खेळाडूंना मागे टाकत होते.

या स्पर्धेत याकुब वडलेजच आणि नीरज चोप्रानंतर तिसऱ्या क्रमांकावर फिनलँडचा ऑलिव्हर हेलँडर राहिला. त्याने तिसऱ्या प्रयत्नात 83.74 मीटर लांब भाला फेकला.

रविवारी नीरजचा पहिला प्रयत्न फाऊल ठरला, तर दुसऱ्या प्रयत्नात 83.80 मीटर लांब भाला त्याने फेकला. त्यामुळे तो दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला. नंतरच्या चारही प्रयत्नात नीरजला ८२ मीटरपेक्षा लांब भाला फेकता आला नाही.

दरम्यान, याकुब वडलेजच मागील महिन्यातच झुरिच डायमंड लीग स्पर्धेतही नीरजला मागे टाकत अव्वल क्रमांक मिळवला होता. त्या स्पर्धेतही नीरज दुसऱ्या क्रमांकावर राहिला होता. नीरजने त्यापूर्वी मे महिन्यात दोहा डायमंड लीगमध्ये आणि लुसेन डायमंड लीगमध्ये विजेतेपद मिळवले होते. 

तसेच ऑगस्टच्या अखेरीस नीरजने वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये सुवर्णपदकाला गवसणी घातली होती. त्या स्पर्धेत याकुब वडलेजच तिसऱ्या क्रमांकावर राहिला होता

दरम्यान नीरज आता आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळताना दिसणार आहे.

तथापि नीरज व्यतिरिक्त रविवारी डायमंड लीग फायनल 2023 मध्ये लांब उडी प्रकारात भारताचा मुरली श्रीशंकर आणि 300 मीटर स्टीपलचेस प्रकारात अविनाश साबळे हे देखील पात्र ठरले होते. मात्र, त्यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेला प्राधान्य देत या स्पर्धेतून माघार घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT