निरजला अंतिम सामन्यापूर्वी त्याला आपला भाला मिळत नव्हता.  Dainik Gomantak
क्रीडा

Tokyo Olympics: अंतिम सामन्यात पाकिस्तानच्या अर्शदने घेतला होता नीरजचा भाला

पण निरजला अंतिम सामन्यापूर्वी त्याला आपला भाला मिळत नव्हता. अंतिम सामन्यात निरजची स्पर्धा पाकिस्तानच्या अर्शद नदीमसोबत होती.

दैनिक गोमन्तक

पाकिस्तानच्या अर्शद नदीम (Arshad Nadeem of Pakistan) याने अंतिम सामन्यापूर्वी नीरज चोप्राचा भाला घेतला होता अशी बातमी समोर आली आहे. नीरज चोप्राने टोकियो (Neeraj Chopra Tokyo Olympics) ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. भारताला 121 वर्षांनंतर अॅथलेटिक्समध्ये (Athletics) पदक मिळाले. यापूर्वी, नॉर्मन प्रीचार्डने 1900 च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन रौप्यपदके जिंकली होती. त्यानंतर नॉर्मनने पुरुषांची 200 मीटर स्पर्धा आणि पुरुष 200 मीटर अडथळ्यांच्या स्पर्धेत रौप्य पदके पटकाविले. नीरज भालाफेकने (Javelin throw) थ्रोच्या अंतिम फेरीत 87.58 मीटर लांब भाला फेकून भारताला सुवर्ण मिळवून दिले. पण निरजला अंतिम सामन्यापूर्वी त्याला आपला भाला मिळत नव्हता. अंतिम सामन्यात निरजची स्पर्धा पाकिस्तानच्या अर्शद नदीमसोबत होती.

एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत नीरज म्हणाला, 'मी फायनल सुरू होण्यापूर्वी माझ्या भालाचा शोध घेत होतो. मी सगळीकडे पाहिले मला ते कुठेही सापडले नाही. अचानक माझी नजर अर्शद नदीमवर पडली. तो माझा भाला घेऊन फिरत होता. मी त्याला म्हणालो, 'भाऊ, हे माझे आयुष्य आहे. मला ते दे. मला ते फेकायचे आहे. मग त्याने ते मला परत दिले. त्यामुळे मी माझा पहिला फेक घाईत टाकला.

नीरज पुढे म्हणाला, 'अर्शदने पात्रता फेरीत खूप चांगली कामगिरी केली. फायनलमध्येही तो चांगला खेळला. मला वाटते की पाकिस्तानसाठी हे चांगले आहे त्यांना भालाफेकमध्ये रस दाखवण्याची चांगली संधी त्यांना आहे. तो भविष्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी करू शकतो.

नीरजने पाकिस्तानी जनतेला एक संदेशही दिला आहे. तो म्हणाला, 'अर्शद नदीमला पाठिंबा द्या. त्यांने भालाफेकामध्ये पाकिस्तानला एका उंचीवर नेले आहे आणि त्याला तुमच्या सहकार्याची गरज आहे.

हरियाणातील पानिपत जवळ असलेल्या खांद्रा गावातील एका शेतकऱ्याचा मुलगा नीरजने पदक जिंकून भारताचा गौरव केला आहे. तत्पूर्वी, दिवंगत मिल्खा सिंह आणि पीटी उषा यांचे 1964 आणि 1984 मध्ये थोडक्यात ऑलिंपिकपदक हुकले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'गोंयत कोळसो नाका' आंदोलनाला विरोधी पक्षांची एकजूट! आलेमाव, सरदेसाई अन् परबांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले, 'कोळशाच्या मुद्यावर गप्प बसणारे आता...'

Goa Sex Racket Bust: वास्को पोलिसांची दाबोळीतील 'स्पा'वर छापेमारी, सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करत सहा महिलांची सुटका; दोघे अटकेत

Krishnaji Kank: फोंडा किल्ल्यासाठी शंभूराजे दौडत आले, गोव्याचा गव्हर्नर पोर्तुगीज सैन्यासह पळत सुटला; शूरवीर कृष्णाजी कंकांची कथा

Terrorists Attack in India: हाफिज सईदकडून भारतावर हल्ल्याचा कट, बांगलादेशला 'लाँचपॅड' बनवण्याची तयारी; दहशतवादी सैफुल्लाहचा चिथावणीखोर VIDE0 व्हायरल

Ironman 70.3 Goa India: गोवा 'आयर्नमॅन' स्पर्धेत विदेशी खेळाडूंनी मारली बाजी! भारतीय एअर फोर्सनेही नोंदवला तिहेरी विजय

SCROLL FOR NEXT