Olympic Champion Neeraj Chopra: ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्राने पुन्हा एकदा जागतिक पटलावर झेंडा फडकवण्याचे काम केले आहे. जागतिक ऍथलेटिक्सने जाहीर केलेल्या ताज्या पुरुष भालाफेक क्रमवारीत तो जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकाचा खेळाडू बनला आहे.
नीरजने आपल्या करिअरमध्ये पहिल्यांदाच ही कामगिरी केली आहे. नीरजने ग्रेनेडाचा दिग्गज भालाफेकपटू अँडरसन पीटर्सला मागे सोडले आहे.
दरम्यान, नीरज चोप्रा (Neeraj Chopra) सध्या 1455 गुणांसह ताज्या जागतिक अॅथलेटिक्स क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे, तर अँडरसन पीटर्स 1433 गुणांसह जगातील दुसरा भालाफेकपटू आहे. तो नीरजपेक्षा 22 गुणांनी मागे आहे.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) रौप्य पदक जिंकणारा झेक प्रजासत्ताकचा जॅकब वडलेज 1416 गुणांसह जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर आहे.
दुसरीकडे, 25 वर्षीय नीरज गेल्या वर्षी 30 ऑगस्ट रोजी जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला होता, परंतु तेव्हापासून तो पीटर्सला मागे टाकू शकला नाही.
तथापि, त्याने पुढच्याच महिन्यात झुरिच येथे डायमंड लीग 2022 ची अंतिम फेरी जिंकली आणि ही स्पर्धा जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला.
त्याचवेळी, आता 5 मे रोजी त्याने 88.67 मीटर फेक करुन दोहा डायमंड लीगचे विजेतेपद पटकावले. यामुळे तो भालाफेक करणारा नंबर वन ठरला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.