trending cricket news Dainik Gomantak
क्रीडा

Navjot Singh Sidhu: सिद्धूची भविष्यवाणी ठरली खरी! सिराज 'मॅन ऑफ द मॅच', धोनीचा 'फुसका फटाक' चर्चेत

MS Dhoni Viral News: कर्णधार शुबमन गिल नेतृत्वाखाली १५३ धावांचं आव्हान सहज पूर्ण केलं, या सामन्यानंतर नवजोत सिंह सिद्धू पुन्हा चर्चेत आलाय

Akshata Chhatre

IPL 2025: सध्या देशात जर का सर्वाधिक चर्चा कोणाची सुरु असेल तर ती म्हणजे सुरु असलेल्या आयपीएलची. रविवारी (६ एप्रिल) सनरायझर्स हैद्राबाद आणि गुजरात टायटन्स यांच्यामध्ये जबरदस्त सामना रंगला. या सामन्यात गुजरातने हैद्राबादला त्यांच्या घरच्या मैदानात पाणी पाजलं. कर्णधार शुबमन गिल नेतृत्वाखाली १५३ धावांचं आव्हान सहज पूर्ण केलं. या सामन्यानंतर नवजोत सिंह सिद्धू पुन्हा चर्चेत आलाय तो त्याच्या भविष्यवाणीमुळे . काय आहे ती भविष्यवाणी जाणून घेऊया.

नवजोत सिंह सिद्धूची भविष्यवाणी काय?

या सामन्यात सिराजने हैद्राबादच्या अभिषेक शर्मा आणि ट्रेव्हिस हेड यांचा खेळ वेळेत आटोक्यात आणत गुजरातसाठी रास्ता मोकळा केला. यानंतर सिराजने अनिकेत वर्मा आणि सिमरजीत सिंह यांना देखील बाद केलं. या सामन्यात सिराजने ४. २० च्या इकॉनॉमी रेटने या ४ विकेट्स घेतल्या आणि मॅन ऑफ द मॅच बनला. नवजोत सिंह सिद्धूने सिराजला मॅन ऑफ द मॅच मिळणार अशी भविष्यवाणी केली होती जी खरी ठरलीये.

धोनी म्हणजे फुसका फटका

शनिवारी (५ एप्रिल) रोजी झालेल्या सामन्यात चेन्नईला पुन्हा एकदा मात पचवावी लागली होती. या सामन्यानंतर चेन्नई यंदाच्या वर्षी चषक जिंकेल अशी अशा त्यांच्या चाहत्यांना देखील वाटत नसल्याच्या चर्चा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दिल्लीच्या विरुद्ध खेळलेल्या या सामन्यात चेन्नईने २५ धावांनी पराभव स्वीकारला आणि यानंतर धोनीला सर्वांच्या टीकेला सामोरं जावं लागलं.

चेन्नईच्या घरच्या मैदानात सुरु असलेल्या या सामन्यात धोनीचा जयजयकार सुरु होता. मात्र यावेळी धोनी फ्री-हिटवर षटकार मारण्यात अपयशी ठरल्याने चाहते नाराज झाले. यावेळीच नवजोत सिंग सिद्धू यांनी धोनीला फुसका फटाका म्हटलं. धोनी खेळतोय म्हणजे नक्कीच षटकार जाईल अशी चाहत्यांना अशा होती मात्र त्यांच्या हाती निराशाच आली, एवढंच नाही तर नवजोत सिंग सिद्धूने धोनीला असं का म्हटलं असा प्रश्न देखील चाहत्यांना पडलाय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Super Cup: सुपर कपचा बिगुल! 25 ऑक्टोबरपासून रंगणार थरार; FC Goa समोर विजेतेपद राखण्याचे खडतर आव्हान

Goa Taxi: 'टॅक्‍सी ॲग्रीगेटर जबरदस्तीने लादणार नाही'! गुदिन्‍होंची हमी; सरकारकडे सुमारे 3500 सूचना, हरकती

Panaji: ‘बोर्डवॉक’ची पणजी महानगरपालिका दुरुस्ती करणार? 2 वर्षांपासून दुर्दशा; धोका असूनही नागरिकांचा वावर

Chandel Hasapur: सरपंचालाच मिळाली सरकारी नोकरी, पदासह दिला पंच सदस्यत्वाचा राजीनामा; चांदेल हसापूरमध्ये रंगणार रस्सीखेच

Goa ITI: ‘आयटीआय’ करणाऱ्यांसाठी खूशखबर! 2 वर्षांच्‍या कोर्सनंतर मिळणार दहावी, बारावी उत्तीर्ण प्रमाणपत्र; मुख्‍यमंत्र्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT