Manish Jadhav
आयपीएल 2025 च्या लिलावात 2 कोटी बेस प्राईससह दाखल झालेल्या इंग्लंडच्या टॉम बँटनला कोणत्याही संघाने खरेदी केले नाही. परंतु बँटनने आता एक मोठी कामगिरी करुन अवघ्या जगाला आपली प्रतिभा दाखवून दिली.
बँटनने सोमरसेटविरुद्ध काउंटी डिव्हिजन 1 सामन्यात खेळताना 150 वर्षांतील सर्वोच्च धावसंख्या उभारली. त्याने वॉर्सेस्टरशायरविरुद्ध हा अद्भुत पराक्रम केला.
दुसऱ्या दिवसाच्या खेळाच्या अखेरीस बँटनने 381 चेंडूंचा सामना करत 53 चौकार आणि 1 षटकारासह 344 धावांची तूफानी खेळी खेळली.
बँटनच्या 344 धावा ही सॉमरसेटच्या 150 वर्षांच्या इतिहासात कोणत्याही फलंदाजाने केलेली सर्वोच्च धावसंख्या आहे. या बाबतीत त्याने ऑस्ट्रेलियाच्या जस्टिन लँगरचा 342 धावांचा विक्रम मोडला.
बँटनच्या मॅरेथॉन खेळीचा प्रभाव त्याच्या संघाच्या सोमरसेटच्या वॉर्सेस्टरशायर विरुद्धच्या स्कोअरबोर्डवर स्पष्टपणे दिसून आला. दुसऱ्या दिवसअखेर पहिल्या डावात त्यांनी 6 बाद 637 धावा केल्या. वॉर्सेस्टरशायरविरुद्धच्या पहिल्या डावात सॉमरसेटने 483 धावांची आघाडी घेतली आहे.