Navelim Rosary College  Dainik Gomantak
क्रीडा

आंतरमहाविद्यालयीन मेन्स सायकलिंग स्पर्धेत रोझरी महाविद्यालयाने पटकावले जेतेपद!

पणजी: आंतरमहाविद्यालयीन पुरुष सायकलिंग स्पर्धेत नावेलीच्या रोझरी महाविद्यालयाने सांघिक विजेतेपद प्राप्त केले.

किशोर पेटकर

पणजी: आंतरमहाविद्यालयीन पुरुष सायकलिंग स्पर्धेत नावेलीच्या रोझरी महाविद्यालयाने सांघिक विजेतेपद प्राप्त केले. गोवा विद्यापीठाच्या मान्यतेने रोझरी महाविद्यालयातर्फे स्पर्धा घेण्यात आली. सांघिक गटात केपे सरकारी महाविद्यालयास उपविजेतेपद, तर कुठ्ठाळीच्या सेंट जोसेफ वाझ महाविद्यालयास तिसरा क्रमांक मिळाला. 35 किलोमीटर अंतराच्या या स्पर्धेत विविध महाविद्यालयांतील 60 स्पर्धक सहभागी झाले होते.

दरम्यान, वैयक्तिक गटात मडगावच्या पार्वतीबाई चौगुले महाविद्यालयाच्या मार्क जुझे फर्नांडिस याने पहिला क्रमांक मिळविला. रोझरी महाविद्यालयाच्या वालंको फर्नांडिस याला दुसरा, तर मिरामारच्या व्ही. एम. साळगावकर कायदा महाविद्यालयाच्या अमित सुकठणकर याला तिसरा क्रमांक मिळाला.

दुसरीकडे, मडगावच्या गोविंद रामनाथ कारे महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण आणि क्रीडा संचालक मनोज हेदे, नावेलीच्या रोझरी महाविद्यालयाचे प्रिन्सिपल हेलिक बार्रेटो यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले. यावेळी रोझरी महाविद्यालयाचे फ्रान्सिस लोबो, केपे सरकारी महाविद्यालयाचे राजन मॅथ्यू, पार्वतीबाई चौगुले महाविद्यालयाचे देवाशिष बागची, आवेर्तान बार्रेटो, एलरॉय पिंटो यांची उपस्थिती होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Murder Case: घरगुती वादातून काकाचा खून अन् आयुष्याची झाली माती! 29 वर्षाच्या दोषी पुतण्याला कोर्टाचा दणका; ठोठावली जन्मठेपेची शिक्षा

Goa Formula Racing Scam: वीजबिलांचा भार जनतेवर; मोपा येथे महाघोटाळा, सवलतींचा वर्षाव इव्हेंटवर, काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनीही केला आरोप

Goa Politics: 'आरजी'चा फुटबॉल वीरेशच्या हाती; राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने तडकाफडकी राज्य समित्या बरखास्त

Sanjil Kudchadkar Kidnapping Case: कोंब-मडगाव परिसरातील घटनेमुळे खळबळ; कौटुंबिक वादातून पॅथॉलॉजी लॅबचालकाचे अपहरण

Maharashtra FDA Action: तुकाराम मुंढेंचा बॉलिवूडला दणका! गुटख्याची जाहिरात करणाऱ्या सेलिब्रिटींवर होणार कारवाई; एफडीए ॲक्शन मोडवर

SCROLL FOR NEXT