Naveen-Ul-Haq | Virat Kohli Dainik Gomantak
क्रीडा

Virat Kohli - Naveen-ul-Haq Fight: 'विराटनेच भांडण सुरु केले अन्...', दीड महिन्याने नवीनचा IPL 2023 मधील वादाबद्दल मोठा खुलासा

आयपीएल 2023 मध्ये विराट कोहलीशी झालेल्या मोठ्या भांडणाबद्दल नवीन-उल-हकने प्रतिक्रिया दिली आहे.

Pranali Kodre

Naveen-ul-Haq on Fight with Virat Kohli during IPL 2023: आयपीएल 2023 स्पर्धेत अनेक घटना घडल्या, ज्यांची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. अशीच एक घटना म्हणजे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा फलंदाज विराट कोहली आणि लखनऊ सुपर जायंट्सचा वेगवान गोलंदाज नवीन उल हक व मार्गदर्शक गौतम गंभीर यांच्यात झालेले वाद.

आयपीएल 2023 मध्ये 1 मे रोजी लखनऊच्या एकाना स्टेडियमवर बेंगलोर आणि लखनऊ संघात सामना झाला होता.

या सामन्यात बेंगलोरने दिलेल्या 127 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना लखनऊने 8 विकेट्स गमावल्यानंतर अमित मिश्रा आणि नवीन-उल-हक फलंदाजी करत होते. त्यावेळी विराट क्षेत्ररक्षण करत असताना त्याची त्यांच्याशी शाब्दिक बाचाबाची झाली.

सामना झाल्यानंतरही विराट आणि नवीन यांच्यात हात मिळवत असताना वाद झाले. हे वाद पुढे इतके वाढले की लखनऊचा मार्गदर्शक गौतम गंभीर आणि विराट कोहली एकमेकांना भिडले. या घटनेची क्रिकेटविश्वात मोठ्या प्रमाणात चर्चा झाली.

आता त्या घटनेबद्दल नवीनने जवळपास दीड महिन्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्याने बीसीसी पाश्तोशी बोलताना सांगितले की 'त्याने सामन्यादरम्यान आणि नंतर जे काही बोलले, ते बोलायला नव्हते पाहिजे. सामन्यानंतरही जेव्हा आम्ही हात मिळवत होतो, तेव्हाही विराटनेच भांडणाला सुरुवात केली. जर तुम्ही आम्हाला झालेल्या दंडाकडे पाहात, तर तुम्हाला लक्षात येईल की कोणी भांडण सुरू केले होते.'

त्या सामन्यात झालेल्या वादाबद्दल बीसीसीआयने त्यांच्यावर कारवाईही केली होती. आयपीएलच्या आचार संहितेचा भंग झाल्याने बीसीसीआयने विराट आणि गंभीरवर सामनाशुल्काच्या 100 टक्के दंड ठोठावला होता, तर नवीनला सामनाशुल्काच्या 50 टक्के दंड झाला होता.

नवीनने पुढे सांगितले की 'मी फक्त एक गोष्ट सांगेल मी साधारणत: कोणालाही स्लेज करत नाही आणि जरी मी केले, तरी मी फलंदाजाला करेल. कारण मी गोलंदाज आहे. त्या सामन्यात मी एकाही शब्द बोललो नव्हतो. मी कोणालाही स्लेज केले नाही. जे खेळाडू तिथे होते, त्यांना माहित आहे, मी परिस्थितीत कशी हाताळली.'

याशिवाय नवीनने असेही म्हटले की विराटनेच वादाला तोंड फोडले होते. तो म्हणाला, 'जेव्हा मी फलंदाजी करत होतो आणि सामन्यानंतरही मी संयम गमावला नव्हता. मी सामन्यानंतर जे केले, ते सर्व पाहू शकत होते. मी हात मिळवत होतो आमि त्यानंतर विराटने माझा हात बळजबरी धरला. मी सुद्धा एक माणूस आहे, त्यामुळे मीही त्यावर प्रतिक्रिया दिली.'

दरम्यान, या वादानंतर नवीनला सोशल मीडियावर आणि मैदानात सामना पाहायला आलेल्या चाहत्यांकडूनही मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Tourism: 500 वर्षांपूर्वीचे दगड, पोर्तुगीज कालीन किल्ला, गर्दीपासून दूर 'या' गावाने जपलेय 'पारंपरिक पर्यटन'

IND vs AUS 1st T20: ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला टी-20 सामना रद्द! पुन्हा एकदा पाऊस ठरला व्हिलन; फॉर्ममध्ये परतला कर्णधार 'सूर्या'

दक्षिण गोवा पोलिस अधीक्षकांची चौकशी करा, खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी मडगावच्या PSI विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी

IND vs AUS 1st T20: सर्वात जलद 150 षटकार...! कर्णधार सूर्यकुमार यादवचं धूमशान, तूफानी षटकार ठोकत रोहित शर्माला सोडले मागे; व्हिडिओ पाहून व्हाल थक्क

India President: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी 'राफेल'मधून घेतली भरारी, पाकड्यांच्या दाव्याचीही पोलखोल; म्हणाल्या, 'हा माझ्यासाठी अविस्मरणीय अनुभव...' VIDEO

SCROLL FOR NEXT