Naveen-Ul-Haq Troll: विराटशी पंगा नवीनला नडतोय? मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंची ट्रोल करणारी पोस्ट व्हायरल

IPL 2023 एलिमिनेटर सामन्यानंतर मुंबई इंडियन्सच्या काही खेळाडूंनी लखनऊचा युवा वेगवान गोलंदाज नवीन-उल-हकला ट्रोल केले होते.
Naveen-Ul-Haq
Naveen-Ul-Haq Dainik Gomantak

Mumbai Indians Players Troll Naveen-Ul-Haq: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत बुधवारी मुंबई इंडियन्सने एलिमिनेटर सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सला 81 धावांनी पराभूत केले. या सामन्यानंतर लखनऊचे स्पर्धेतील आव्हान देखील संपुष्टात आले आहे. दरम्यान, या सामन्यानंतर लखनऊचा युवा वेगवान गोलंदाज नवीन-उल-हक चांगलाच चर्चेत राहिला.

तो केवळ त्याच्या मैदानातील कामगिरीमुळे नाही, तर त्याचे विराट कोहलीबरोबर झालेले वाद आणि त्यानंतर सोशल मीडिया वॉरमुळेही चर्चेत राहिला. त्यातच मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनीही त्याला ट्रोल केले आहे.

Naveen-Ul-Haq
IPL 2023: नोबॉलवर आऊट? टीम डेव्हिडच्या विकेटनंतर चर्चेला उधाण, पाहा Video

खंरतर 1 मे रोजी लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यातील सामन्यावेळी विराट कोहलीचे नवीन आणि लखनऊचा मार्गदर्शक गौतम गंभीर यांच्याबरोबर मोठे वाद झाले होते. या वादानंतर लखनऊच्या गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यावेळी विराटने इंस्टाग्रामला गुजरातच्या खेळाडूंच्या कौतुकाच्या पोस्ट शेअर केल्या होत्या.

त्यानंतर बेंगलोर विरुद्ध मुंबई यांच्यातील सामन्यावेळी नवीन उल हकने आंबे खाताना काही क्रिप्टिक पोस्ट केल्या होत्या. त्यावेळी त्याला विराटला ट्रोल करायचे होते, असा अंदाज अनेक सोशल मीडिया युजरने लावला होता.

Naveen-Ul-Haq
IPL 2023: गेल्यावर्षी 9 वा क्रमांक, पण यंदा थेट फायनलमध्ये! CSK च्या 'परफेक्ट कमबॅक'ची 5 कारणे

या सोशल मीडिया वॉरनंतर आता मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनीही एलिमिनेटर सामन्यानंतर नवीनला ट्रोल केले. मुंबई इंडियन्सचा खेळाडू संदीप वॉरियर याने इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला होता. त्याने पोस्ट केलेल्या पोस्टमध्ये दिसते की वॉरियरबरोबर विष्णू विनोद आणि कुमार कार्तिकेय देखील आहेत.

हे तिघेही एका टेबलवर बसले आहेत आणि त्यांच्यामध्ये आंबे आहेत. तसेच या तिघांमध्ये एकाने डोळ्यांवर, एकाने कानावर आणि एकाने तोंडावर हात ठेवला आहे. तसेच या पोस्टला 'स्विट सिजन ऑफ मँगो' असे कॅप्शनही वॉरियरने दिले होते. मात्र ही पोस्ट वॉरियरने काही वेळानंतर डिलीट केली. पण तोपर्यंत हा फोटो व्हायरल झाला होता.

Sandeep Warrier Post
Sandeep Warrier PostScreengrab/Instagram

दरम्यान, ज्यावेळी विराट, गंभीर आणि नवीन यांच्यात वाद झाले होते, त्यानंतर बीसीसीआयने त्यांच्यावर कारवाईही केली होती. आयपीएलच्या आचार संहितेचा भंग झाल्याने बीसीसीआयने विराट आणि गंभीरवर सामनाशुल्काच्या 100 टक्के दंड ठोठावला होता, तर नवीनला सामनाशुल्काच्या 50 टक्के दंड झाला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com