राष्ट्रीय स्पर्धेत उपविजेता ठरल्यामुळे एथन आगामी विश्वकरंडक बुद्धिबळ स्पर्धेत भारताकडून खेळेल. Dainik Gomantak
क्रीडा

बुद्धिबळपटू एथनला राष्ट्रीय रौप्यपदक

राष्ट्रीय स्पर्धेत उपविजेता ठरल्यामुळे एथन आगामी विश्वकरंडक बुद्धिबळ स्पर्धेत भारताकडून खेळेल. येत्या ऑगस्टमध्ये फिडेची ऑनलाईन रॅपिड विश्वकरंडक स्पर्धा कॅडेट्स, यूथ, 10 वर्षांखालील गटात होणार आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: गोव्याचा (Goa) युवा गुणवान बुद्धिबळपटू एथन वाझ (Chess player Ethan Vaz) याने राष्ट्रीय 10 वर्षांखालील बुद्धिबळ स्पर्धेत खुल्या गटात रौप्यपदक (Silver medal) जिंकले, या कामगिरीसह तो विश्वकरंडक स्पर्धेसाठीही पात्र ठरला आहे. (National silver medal for chess player Ethan)

एथनला राष्ट्रीय सुवर्णपदक थोडक्यात हुकले. स्पर्धेत अपराजित राहताना त्याने 11 फेऱ्यांत 10.5 गुणांची कमाई केली. त्याइतकेच गुण रेयान महंमद यानेही नोंदविले. मात्र टायब्रेकर गुणांत रेयान अव्वल ठरला, तर एथनला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. स्पर्धेत एकूण 929 खेळाडूंचा सहभाग होता.

राष्ट्रीय स्पर्धेत उपविजेता ठरल्यामुळे एथन आगामी विश्वकरंडक बुद्धिबळ स्पर्धेत भारताकडून खेळेल. येत्या ऑगस्टमध्ये फिडेची ऑनलाईन रॅपिड विश्वकरंडक स्पर्धा कॅडेट्स, यूथ, 10 वर्षांखालील गटात होणार आहे, अशी माहिती गोवा बुद्धिबळ संघटनेचे सचिव किशोर बांदेकर यांनी दिली. एथन हा 10 वर्षांखालील वयोगटातील सध्याचा गोवा राज्यस्तरीय विजेता आहे. सलग तीन वर्षे आपल्या वयोगटात राज्यस्तरीय स्पर्धा जिंकून त्याने आगळी हॅटट्रिक नोंदविली आहे.

राष्ट्रीय रौप्यपदक जिंकल्याबद्दल गोवा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी एथनचे अभिनंदन केले आहे. ‘‘देशातील नऊशेपेक्षा जास्त उत्कृष्ट बुद्धिबळपटूंत पदक जिंकणे ही फार मोठी घटना आहे. गोमंतकीय बुद्धिबळासाठी ही बाब भूषणावह असून आम्ही एथनला शाबासकी देत आहोत,’’ असे काब्राल यांनी नमूद केले. विश्वकरंडक स्पर्धेसाठी एथनला काब्राल व बांदेकर यांनी सुयश चिंतिले आहे.

एथन सासष्टी तालुक्यातील राय येथील असून त्याची आई लिंडा फर्नांडिस-वाझ व वडील एडविन वाझ हे संगणक अभियंता आहेत. सां जुझे द आरियल येथील किंग्ज स्कूलमध्ये तो पाचव्या इयत्तेतील विद्यार्थी आहे. मडगाव येथील चेस गुरू गोवा अकादमीचे प्रकाश सिंग यांचे त्याला मार्गदर्शन लाभते.

एथनची चमकदार कामगिरी

- 2019 मध्ये पश्चिम आशियाई बुद्धिबळ स्पर्धेत सुवर्ण, रौप्यपदक

- गोवा राज्यस्तरीय स्पर्धेत 2021 मध्ये 10 वर्षांखालील, 2019 व 2020 मध्ये 9 वर्षांखालील गटात विजेता

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

Goa News Live: ओपा जल शुद्धीकरण प्रकल्पाजवळ ट्रक दरीत कोसळला

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT