Archery competition Dainik Gomantak
क्रीडा

National Junior Archery Competition: महाराष्ट्राची पोरं अन् हरियाणाच्या पोरी 'जिंकल्या'

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पर्धेचे केले उद्घाटन

दैनिक गोमन्तक

पणजी: महाराष्ट्राच्या मुलांनी, तर हरियाणाच्या मुलींनी 42 व्या राष्ट्रीय ज्युनियर तिरंदाजी स्पर्धेत रिकर्व्ह राऊंड प्रकारात सांघिक विजेतेपद मिळविले. या गटातील लढती आज ( शुक्रवारी ) कांपाल येथील मैदानावर पार पडल्या.

(National Junior Archery competition started at Panaji Campal Maharashtra boys team won)

ज्युनियर मुलांच्या अंतिम लढतीत महाराष्ट्राने हरियाणाचे कडवे आव्हान 29-28 असे शूटऑफद्वारे परतावून लावले. दोन्ही संघांत 4-4 अशी बरोबरी झाल्यानंतर शूटआऊटचा अवलंब करण्यात आला. पार्थ साळुंखे महाराष्ट्राच्या विजेतेपदाचा शिल्पकार ठरला. त्याने वैयक्तिक गटातही 676 गुणांची नोंद केली.

मुलींत विजेतेपद मिळवताना हरियाणाने मध्य प्रदेशचा 6-0 फरकाने धुव्वा उडविला. हरियानाच्या संघात 21 वर्षांखालील विश्वकरंडक विजेती रिद्धी, भजन कौर व तिशा यांचा समावेश होता, त्यांनी शानदार नेम साधत लौकिकास साजेशी कामगिरी केली. मुलींच्या वैयक्तिक गटात पंजाबची ईशा 623 गुणांसह अव्वल आहे. मुलांत ब्राँझपदक सेनादलास मिळाले. त्यांनी पुदुचेरीवर 5-1 फरकाने मात केली. मुलींत तिसरा क्रमांक मिळविताना चंडीगडने झारखंडचा 6-2 असा पराभव केला.

मुख्यमंत्र्यांचीही तिरंदाजी

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पर्धेचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी तिरंदाजीतील आपले कौशल्य आजमावताना लक्ष्यावर नेमही साधला. यावेळी भारतीय तिरंदाजी संघटनेचे सचिव प्रमोद चांदुरकर, खजिनदार राजेंद्रसिंग तोमर, गोव्याचे क्रीडा संचालक अजय गावडे, गोवा हौशी तिरंदाजी संघटनेचे अध्यक्ष किरण कांदोळकर, कार्याध्यक्ष डॉ. नीलेश कोरडे, सचिव चेतन कवळेकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL 2026 Points Table: पंजाबचा 'पंजा' भारी! डबल हेडरनंतर गुणतालिकेत 'टॉपर'; मुंबई-चेन्नई अन् कोलकाताच्या गोटात चिंतेचं सावट

Israel Lebanon Map: युद्धविरामानंतर इस्रायलचा मोठा 'गेम'! नकाशाद्वारे लेबनॉनच्या भूभागावर वर्चस्व सिद्ध; हिजबुल्लासाठी धोक्याची घंटा

Vaibhav Suryavanshi Crying: टोपीने तोंड लपवले, डोळे पुसले पण हुंदका थांबेना! राजस्थानचा 'वंडर बॉय' ढसाढसा रडला; '16 सेकंदांचा' व्हिडिओ व्हायरल

Middle East War: "युद्ध तुम्ही लादलं, खर्चही तुम्हीच द्या''! युएईची अमेरिकेला थेट तंबी; डॉलर सोडून चिनी 'युआन'कडे वळण्याचा दिला इशारा

Indian Football League: आघाडी घेतल्यानंतर धेंपो क्लब पराभूत, राजस्थान युनायटेडचा पिछाडीवरून 2-1 असा झुंझार विजय

SCROLL FOR NEXT