Men's 102kg weightlifting medalist National Games Goa 2023 Dainik Gomantak
क्रीडा

National Games Goa 2023: सेनादलाच्या वेटलिफ्टरला सुवर्णपदक; तर गोव्याच्या शुभम वर्मा याला रौप्य

किशोर पेटकर

National Games Goa 2023: गोव्यातील ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सेनादलाच्या कोजुम ताबा याने पुरुषांच्या १०२ किलो वजनगटात सुवर्णपदक जिंकले. त्याला मूळ सेनादल, पण आता गोव्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या शुभम वर्मा याने जोरदार आव्हान दिले.

कांपाल येथील स्पर्धा क्रीडानगरीत झालेल्या वेटलिफ्टिंगमध्ये शनिवारी कोजुम याने स्नॅचमध्ये १४८ व क्लीन अँड जर्कमध्ये १८२ किलो वजन उचलून एकूण ३३० किलो वजनासह अव्वल क्रमांक मिळविला.

शुभम याने एकूण ३२६ किलो वजन उचलून दुसरा क्रमांक मिळविला. त्याने स्नॅचमध्ये १४३ व क्लीन अँड जर्कमध्ये १८३ किलो वजन उचलले.

आसामचा महंमद जमीर हुसेन ब्राँझपदकाचा मानकरी ठरला. त्याने त्याने एकूण ३२५ किलो वजन उचलताना स्नॅचमध्ये १४५ किलो, तर क्लीन अँड जर्कमध्ये १८० किलो वजन पेलले.

बास्केटबॉलमध्ये केरळ, पंजाब विजेते

नावेली येथील मनोहर पर्रीकर इनडोअर स्टेडियममध्ये बास्केटबॉलच्या ५ बाय ५ प्रकारात महिला विभागात केरळने सुवर्णपदक जिंकले. त्यांनी अंतिम लढतीत कर्नाटकवर ५७-५४ अशी मात केली.

ब्राँझपदक तमिळनाडूस मिळाले. पंजाबने पुरुष गटात बाजी मारताना अंतिम लढतीत तमिळनाडूला १०५-१०३ असे पराजित केले. दिल्ली संघ ब्राँझपदकाचा मानकरी ठरला.

तलबारबाजीत सेनादल सरस

ताळगाव पठारावरील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये झालेल्या तलवारबाजीत पुरुषांच्या एपी प्रकारात सेनादलाचा सुनील कुमार सुवर्णपदकाचा मानकरी ठरला.

तमिळनाडूच्या एस. शेरजिन राजेंद्रन याला रौप्य, तर महाराष्ट्राचा गिरीश जकाते व सेनादलाचा पंकजकुमार शर्मा यांना ब्राँझपदक प्राप्त झाले.

पुरुषांच्या साब्रे तलवारबाजीत सेनादलाचा के. पी. गिशोनिधी याला सुवर्ण, राजस्थानचा करण सिंग याला रौप्य, तर उत्तर प्रदेशचा गोरथनाथ यादव याला ब्राँझपदक मिळाले.

महिलांच्या साब्रे सांघिक गटात पंजाबने सुवर्णपदक जिंकले. तर केरळला रौप्यपदक मिळाले. तमिळनाडू व हरियानाला ब्राँझपदक प्राप्त झाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Goa Today's News Live: बेपत्ता सुभाष वेलिंगकरांचा अटकपूर्व जामीन अर्ज!

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

SCROLL FOR NEXT