National Games 2023 Goa: राष्ट्रीय खेळांमधील घोटाळे मी याआधी उघडकीस आणले आहेत. आता खेळ चालू असल्याने मला बोलून वातावरण खराब करायचे नाही आहे. मी प्रत्येक अधिवेशनात सरकारचा पर्दाफाश केलेला आहे. नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या 8 आमदारांनी राज्यातील लोकशाही संपवली अशी टिका फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी केली.
केंद्राकडून मिळालेले 600 कोटी रुपये सरकारने विकासावर खर्च केले आहेत. मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडे 250 कोटींचा निधी मागितला आहे. मला राज्यात 600 कोटी रुपयांचा विकास दिसत नाही. विकास गेला कुठे? असा सवालही सरदेसाईंनी सरकारला केला.
फातोर्ड्यातील एका कार्यक्रमात आमदार विजय सरदेसाई बोलत होते. सरदेसाई म्हणाले, "राष्ट्रीय खेळांमधील घोटाळे मी याआधी उघडकीस आणले आहेत. आता खेळ चालू असल्याने मला बोलून वातावरण खराब करायचे नाही आहे."
"पंतप्रधानांच्या दौऱ्याचा फायदा घेऊन आम्ही आमच्या फातोर्डा मतदारसंघाचा विकास केला आहे. आम्ही आमचे अंतर्गत रस्तेही सुधारले आहेत. मडगावच्या तुलनेत फातोर्ड्या पायभुत सुविधा निर्माण करण्यात पुढे आहे. फातोर्डा विकसीत होत असल्याने नागरिकांचे फातोर्ड्याला प्राधान्य आहे."
"मी बोलका आमदार आहे. मी प्रत्येक अधिवेशनात सरकारचा पर्दाफाश केलेला आहे. नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या 8 आमदारांनी राज्यातील लोकशाही संपवली आहे. केंद्राकडून मिळालेले 600 कोटी रुपये सरकारने विकासावर खर्च केले आहेत. मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडे 250 कोटींचा निधी मागितला आहे. मला राज्यात 600 कोटी रुपयांचा विकास दिसत नाही." असे सरदेसाई म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने धर्माचे राजकारण करु नये. हिंदूना एकत्र आणण्यासाठी दुसऱ्या धर्माला दोष देण्याची गरज नाही आहे. गोव्याबाहेरील लोकांनी गोव्यातील हिंदूंना शिकवण्याची गरज नाही. गोव्यातील सर्व धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदत आहेत. भाजप सरकार आपले अपयश लपवण्यासाठी हिंदू खतरे मै है चा नारा देत आहे अशी टिका सरदेसाईंनी केली.
सिव्हील सोसायटीच्या आयोजीत सभेला गोवा फॉरवर्ड पक्षाने पाठिंबा दर्शविला आहे. समस्त गोयकारांनी तसेच गोवा फॉरवर्डच्या सदस्यांनी सभेत सामील व्हावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.